बारामतीकरांनो सावधान,आठ गावांवर त्वरीत कडक निर्बंध लागू..
दि. ७ जुलैपर्यंत हे निर्बंध लागू केले जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे

बारामतीकरांनो सावधान,आठ गावांवर त्वरीत कडक निर्बंध लागू..
दि. ७ जुलैपर्यंत हे निर्बंध लागू केले जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यात कोरोना ची दुसरी लाट ओसरली असतानाच तालुक्यातील आठ गावांमध्ये अचानक कोरोनाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. काही दिवसांत बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र तालुक्याच्या ग्रामीण भागात अद्यापही रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आठ गावांमध्ये १४ दिवस कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी घेतला आहे. यासंदर्भातील आदेशही पारीत करण्यात आले असून स्थानिक पातळीवर कडक निर्बंध लागू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
बारामती तालुक्यातील एका दिवसाला पाचशे रुग्णापर्यंत वाढलेला कोरोनाचा रुग्ण संख्येचा आकडा आता मर्यादित झाला आहे. मात्र 13 पर्यंत खालावलेली रुग्णसंख्या पुन्हा 45, 50 येथून 70 पर्यंत पोचली आहे. त्यातच काही गावांमध्ये रॅपिड एंटीजेन कॅम्प घेण्यात आले, त्यामध्ये ही रुग्ण संख्या आणखी जास्त वाढलेली आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील आठ गावांमध्ये ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ही दहापेक्षा अधिक असल्याने प्रतिबंधित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बारामतीत कडक निर्बंध लागू करत केवळ रुग्णालये आणि औषध विक्री सुरू ठेवण्यात आली. त्याचा चांगला परिणाम होवून कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले.
बारामती शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. यामध्ये काटेवाडी महसुली गावात 27, सावळ गावात 24 आहे. पणदरे गावात 23, शिर्सुफळ गावात 15, मानाजीनगर येथे 12, मोरगाव येथे 12, माळेगाव बुद्रुक येथे दहा, उंडवडी कडेपठार येथे दहा रुग्ण संख्या आहे त्यामुळे या गावांमध्ये 23 जून पासून सात जुलै 2021 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून ही गावे घोषित करण्यात आली आहेत
आजपासून १४ दिवसांसाठी म्हणजेच दि. ७ जुलैपर्यंत हे निर्बंध लागू केले जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.