बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी…
रुग्णांच्या संपर्कातील ५४ जणांचे अहवाल निगेटिव्ह…
बारामती:-प्रतिनिधी
बारामती शहर आणि तालुक्यात शनिवारी आढळलेल्या पाच रुग्णांच्या संपर्कातील सर्वच्या सर्व म्हणजेच ५४ जणांचा
अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी दिली. गेल्या दोन
दिवसांपासून आणखी रुग्ण वाढण्याच्या शक्यतेने धास्तावलेल्या बारामतीकरांना या अहवालामुळे दिलासा मिळाला आहे.
शनिवारी बारामती तालुक्यातील काटेवाडी, सावळ आणि बारामती शहरातील एकूण पाचजणांना कोरोनाची लागण झाली होती.
काल या रुग्णांच्या संपर्कातील ५४ जणांची तपासणी करण्यात आली.आज या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
त्यामुळे बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून बारामतीत रुग्ण वाढतील अशी शक्यता व्यक्त होत होती.
मात्र आजच्या अहवालामुळे बारामतीकरांची चिंता मिटली आहे. असे असले तरी अचानक कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे नागरीकांनी अधिकची खबरदारी घेणे आवश्यक आहे.