बारामतीकर रोहित शिंदेने दाखवलीय यात कमाल! बजाजच्या पल्सरची ही जाहीरात पाहिली का?
कोणाचे कशात करीअर होईल ते सांगता येत नाही..
बारामतीकर रोहित शिंदेने दाखवलीय यात कमाल! बजाजच्या पल्सरची ही जाहीरात पाहिली का?
कोणाचे कशात करीअर होईल ते सांगता येत नाही..
बारामती वार्तापत्र
बांदलवाडी येथील रोहित गेली चार ते पाच वर्षे बाईकचे स्टंट करतो. हे स्टंट त्याने छंदातून सुरू केले,. मात्र तेच एक प्रकारचे उत्तम करीअर बनले आहे. त्याला चित्रपटांतून ऑफर येतात. त्याने आजवर गुजराती, बंगाली चित्रपटांमध्येही बाईकचे स्टंट केले असून आता नुकतीच नव्या पल्सर बाईकची जाहीरात तयार करण्यात आली. गोव्यात चित्रीकरण झालेल्या या बाईकचे स्टंट रोहित याने केले आहेत. दोन मुंबईकर, एका पुण्याच्या स्टंटमनसह रोहित याचा स्टंटमधील नेमकेपणा जाहीरात अधिक प्रभावी होण्यात मदतीचा ठरला आहे.
याचा व्हिडीओ येथे पहा अथवा बारामती वार्तापत्र फेसबुक पेजवर पाहू शकता.
कोणाचे कशात करीअर होईल ते सांगता येत नाही.. बारामती तालुक्यातील बांदलवाडी येथील रोहित दिलीप शिंदे हा युवक देशातील आघाडीचा बाईक स्टंटमॅन आहे. त्याच्या या ख्यातीने आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्येही स्टंट केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बजाज कंपनीच्या पल्सरची एक जाहीरात लक्ष वेधून घेतेय, त्यामध्ये रोहितचा स्टंट आहे..ती जाहीरात तुम्ही पाहिलीय का?
रोहित म्हणतो, बाईक स्टंट म्हणजे रस्त्यावर वेगाने करायचा प्रकार नाही, ज्याप्रमाणे क्रिकेट गल्लीतही खेळले जाते,. मात्र जेव्हा त्याला प्लॅटफॉर्म मिळतो, तेव्हा ते स्टेडिअममध्ये खेळण्यास सुरवात झाली. त्याप्रमाणेच बाईक स्टंट हा साहसी क्रिडाप्रकार आहे, तो पूर्णतः सुरक्षितता घेऊन व स्टेडिअमप्रमाणेच सुरक्षित ठिकाणी करण्याचा क्रिडा प्रकार आहे. ग्रामीण भागातील युवकांसाठी हा एक नवा प्लॅटफॉर्म आहे. मला कोणी शिकवले नाही, मी स्वतः शिकत राहीलो आणि त्यातून नवे प्रकार करीत राहीलो.