क्राईम रिपोर्ट

ऊसतोड कामगारांच्या मोबाईल चोरीचा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलीसांनी केला उघड,२ आरोपींना अटक १२ मोबाईल जप्त

चोरीस गेलेले एकुण २७,०००/- रु किमतीचे सर्व ०६ मोबाईल जप्त करणेत आलेले

ऊसतोड कामगारांच्या मोबाईल चोरीचा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलीसांनी केला उघड,२ आरोपींना अटक १२ मोबाईल जप्त

चोरीस गेलेले एकुण २७,०००/- रु किमतीचे सर्व ०६ मोबाईल जप्त करणेत आलेले

क्राईम;बारामती वार्तापत्र

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हदीतील बाबुराव माळशिकारे यांचे शेतात ऊसतोड कामगार झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीचे सर्वांचे कोपीत ठेवलेले २७,०००/- रु किमतीचे एकुण ०६ मोबाईल चोरुन नेलेले होते, त्यावरुन ऊसतोड टोळी मुकादम श्री सिध्दार्थ कडोबा वाघ रा टाकळे भिवडी ता.भोकरदन जि.जालना सध्या रा मुदाळे ता.बारामती जि.पुणे यांनी मोबाईल चोरीची फिर्याद दिलेने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं- ७०/२०२२ भा.द.वि.३७९ अन्वये
दिनांक- १७/०२/२०२२ रोजी गुन्हा दाखल होवुन सदर गुन्हयाचा तपास पो ना ज्ञानेश्वर सानप यांचेकडे देणेत आलेला
होता.

सदर गुन्हयाचे तपासात अनुषंगाने गोपनीय माहीती व तांत्रिक विश्लेषणातुन मिळालेल्या उपयुक्त माहीतीच्या आधारे सदर गुन्हयाचे तपासकामी संशयित १) अमोल धोंडीराम मोरे वय २३ रा.भोकर ता.श्रीरामपुर जि अहमदनगर सध्या रा कोहाळे बु॥ ता. बारामती जि.पुणे २) दिपक एकनाथ बर्डे वय- १९ रा.नेवासा ता नेवासा जि.अहमदनगर सध्या रा. कोहाळे बु।। ता. बारामती जि.पुणे यांची सखोल व कसोशीने चौकशी केली असता वरील दोघांनी गुन्हा केला असल्याची कबुली दिलेली असुन आरोपी क १ व २ यांना सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करुन दिनांक १८/०२/२०२२ रोजी मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. बारामती यांचे कोर्टात हजर केले असता आरोपींना मा न्यायाधीश सो यांनी दिनांक- २१/०२/२०२२ पर्यंत पोलीस कस्टडी मंजुर केलेली आहे.

सदर गुन्हयाचे तपासात चोरीस गेलेले एकुण २७,०००/- रु किमतीचे सर्व ०६ मोबाईल जप्त करणेत आलेले असुन याव्यतिरीक्त वरील आरोपी क-१ ते २ यांनी विधीसंघर्षग्रस्त बालक नामे ज्ञानेश्वर संताराम मोरे वय-१७ वर्ष ८ महीने याला सोबत घेवुन एकुण १२ मोबाईल
चोरले असल्याची कबुली दिलेने आरोपींकडुन ६५,०००/- रु.जुवा किं.अ चे एकुण १२ मोबाईल जप्त करणेत आलेले आहे.

सदरची कामगिरी मा.श्री.अभिनव देशमुख सो. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा श्री मिलींद मोहीते साो अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा श्री गणेश इंगळे साो. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग, व श्री.अशोक शेळके सो. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे स.पो.नि.सोमनाथ लांडे, तपासी अंमलदार पो.ना. ज्ञानेश्वर सानप, पो.ना.भाऊसाहेब मारकड तसेच पो.हवा/कोकरे, मोमीन स्था.गु.शाखा यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!