क्रीडा

बारामतीची वरदा कुलकर्णी हिची पॅरा ऑलिंपिक राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत यश

१०० मीटर बटरफ्लाय मध्ये ब्राँझ पदक पटकावले.

बारामतीची वरदा कुलकर्णी हिची पॅरा ऑलिंपिक राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत यश

१०० मीटर बटरफ्लाय मध्ये ब्राँझ पदक पटकावले.

बारामती वार्तापत्र

बारामतीची पॅरा स्विमर कुमारी वरदा कुलकर्णी हिने हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. तिने एस १४ कॅटेगरी मध्ये १०० मीटर बॅक स्ट्रोक मध्ये सिल्व्हर मेडल व १०० मीटर बटरफ्लाय मध्ये ब्राँझ पदक पटकावले. सदर स्पर्धा १५ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत हैद्राबाद येथे पार पडल्या. यामध्ये देशातील विविध राज्यातून एकूण ७०० पेक्षा जास्त जलतरणपटू सहभागी झाले होते.

या स्पर्धेत महाराष्टील स्पर्धकांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी मुळे महाराष्ट्राने या चॅम्पियन शिप मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. वरदा कुलकर्णी हिने आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर अनेक पदकांची लयलूट केली आहे. वरदा ही वीर सावरकर जलतरण तलाव येथे सराव करीत आहे.प्रशिक्षक आयर्मन ओम सावळे पाटील, इरफान तांबोळी हे मार्गदर्शन करीत आहे. वरदा ही शिवगुरू या दिव्यांग विशेष मुलांच्या कार्यशाळेत शिक्षण घेत आहे.

वरदा ही विशेष विद्यार्थिनीने ग्रामीण भागातून राष्ट्रिय पातळीवर ठसा उमटवणारी पहिली स्विमर असल्याचे शिवगुरू शाळेचे अध्यक्ष मूथप्पा व्हनकांबळे यांनी सांगितले.

वीर सावरकर जलतरण तलाव चे अध्यक्ष डॉ अशोक तांबे, सचिव श्री विश्वासनाना शेळके, खजिनदार श्री मिलिंद अत्रे व इतर संचालक यांनी अभिनंदन केले.

Back to top button