बारामतीचे आरटीओ पुन्हा नॉट रीचेबल, शिकाऊ परवान्यासाठी आलेल्या नागरिकांची ससेहोलपट; यंत्रणाच बिघडली..!
नागरिकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे

बारामतीचे आरटीओ पुन्हा नॉट रीचेबल, शिकाऊ परवान्यासाठी आलेल्या नागरिकांची ससेहोलपट; यंत्रणाच बिघडली..!
नागरिकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे
बारामती वार्तापत्र
बारामतीत आरटीओ कार्यालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. येथील यंत्रणा विस्कळीत झाल्यामुळे बारामतीसह इंदापूर आणि दौंड तालुक्यातील शिकाऊ परवाना घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची अक्षरश: दैना झाली आहे. सकाळपासून आरटीओ कार्यालयाची यंत्रणाच बिघडली आहे. त्यामुळे शिकाऊ परवाना घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं..
सातत्याने बारामती आरटीओ कार्यालयात काही ना काही बिघाड झालेला असतो. त्यामुळं नागरिकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे या कार्यालयाचे प्रमुख असलेले आरटीओच वेळोवेळी नॉट रीचेबल असतात.
त्यामुळं नागरिकांनी आपल्या अडचणी मांडायच्या कुठे असा सवाल उपस्थित होत आहे. या कार्यालयाला अजितदादांनी अत्याधुनिक पद्धतीने उभारलं. मात्र येथील यंत्रणाच निष्क्रिय असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.






