हृदयविकाराने मृत्यू झाला असे सांगून उरकला अंत्यविधी. व्यवसायिक महिलेचा खून बारामतीतील धक्कादायक प्रकार उघड
महिला मयत आहे हे कळल्यानंतर आरोपी दोघेही घाबरून गेले

हृदयविकाराने मृत्यू झाला असे सांगून उरकला अंत्यविधी. व्यवसायिक महिलेचा खून बारामतीतील धक्कादायक प्रकार उघड
महिला मयत आहे हे कळल्यानंतर आरोपी दोघेही घाबरून गेले
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील कसबा परिसरातील एका महिलेला बारामतीतील एका प्रतिष्टीत कुटुंबातील सदस्यांनी गंभीर मारहाण करत त्या महिलेचा खून केल्याप्रकरणी बहिण-भावाविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश प्रमोद फरतडे व अनुजा प्रमोद फरतडे (रा. कसबा, बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सविस्तर माहिती अशी , बारामती कसबा परिसरामध्ये (दि: ११) रोजी रात्री एका महिलेचा मृत्यू हार्ट अटॅक म्हणून झालेला आहे. परंतु सदर हार्ट अटॅक नसून घातपात आहे याबाबतची कुजबूज त्या परिसरामध्ये सुरू होती. सदरची कुजबूज काही दिवसानंतर पोलिसांच्या कानावर आली. सदर बाब लक्षात घेता बारामती शहर पोलिसांनी त्यांची गोपनीय यंत्रणा कामाला लावली. गोपनीय माहिती काढून वस्तुस्थिती काय आहे याबाबत आढावा घेतला. यामध्ये नागरिकांची चौकशी केली असता
असणाऱ्या लोकांना पोलिसांनी चौकशी ला बोलावले त्यामधून अशी माहिती निष्पन्न की मयत महिला अंदाजे (वय ५० वर्ष) (रा कसबा ) भागात मध्ये राहणारे प्रमोद उर्फ दादा नामदेव फडतरे (वय ६३ वर्षे) (रा: कसबा बारामती) यांच्या सोबत दहा वर्षापासून मैत्रीचे संबंध होते प्रमोद उर्फ दादा हे कसबा यामध्ये त्यांचा मुलगा ऋषिकेश प्रमोद फडतरे (वय ३४ वर्ष) व मुलगी वय (३३ वर्ष) सुन व पत्नी यांच्यासोबत राहत होते.
प्रमोद फडतरे यांचा कसबा भागामध्ये फडतरे वाडा म्हणून दुसरे जुने घर आहे. त्या घरामध्ये मयत व प्रमोद उर्फ दादा नामदेव फडतरे हे अधून मधून एकमेकांना भेटायचे याची कल्पना मयत व प्रमोद दादा फडतरे यांच्या कुटुंबीयांना होती. दोन्ही कुटुंबीयांना त्यांच्या या मैत्रीचा व भेटण्याचा राग होता व ती गोष्ट त्यांना आवडत नव्हती परंतु दोघेही एकमेकांना सर्व विरोध झुगारून अधून मधून भेटत होते. प्रमोद फडतरे यांचा मुलगा ऋषिकेश प्रमोद फडतरे व मुलगी अनुजा प्रमोद फडतरे यांचा या गोष्टीला तीव्र विरोध होता याचाच राग मनात ठेवत मयत महिला प्रमोद उर्फ दादा नामदेव फडतरे या दोघांना काठीने मारहाण केली. मारहाणी नंतर मयत महिला निपचित पडली. व प्रमोद फडतरे जखमी झाले. नंतर प्रमोद फडतरे व आरोपी ऋषिकेश व त्याची बहीण अनुजा यांनी सदर महिलेस दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न केले मात्र सदर महिलेचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सदर महिला मयत आहे हे कळल्यानंतर आरोपी दोघेही घाबरून गेले त्यांनी परत सदरचे प्रेत मूळ ठिकाणी फडतरे वाड्या वर घेऊन आले. त्यानंतर त्यांनी सदरची घटना मयताचे नातेवाईक मुलगा व मुलगी यांच्या कानावर सांगितले व त्यांना सांगितले की सदर महिला नेहमीप्रमाणे त्यांच्या वडीलांकडे आली असताना तिला हार्ट अटॅक आलेला आहे.
घटना क्रमा मध्ये डॉक्टरांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले नंतर दखलपात्र गुन्हा डॉक्टरांच्या जबाबावरून निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून आरोपी ऋषिकेश फडतरे व त्याची बहीण यांनी गुन्हा केल्याची कबुली प्रथम डॉक्टरांकडे दिल्याने व साक्षीदार प्रमोद फडतरे यांनी सुद्धा घटनेबाबत डॉक्टरांना सांगितल्याने त्यांची प्रथम खबरी अहवाल घेऊन या दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख ,अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व पाठपुरावा केला.
सदर आरोपींना आज माननीय न्यायाधीश जाधव मॅडम यांच्यासमोर हजर केले असता त्यांना चार दिवस पोलिस कस्टडी मिळाली आहे. सरकारी वकील म्हणून सोनवणे यांनी काम पाहिले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, सहाय्यक पोलीस फौजदार संजय जगदाळे, पोलीस नाईक कल्याण खांडेकर, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस नाईक संजय जाधव व संपूर्ण डीबी पथक करत आहे.
सदर ठिकाणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळवणे व भौतिक पुरावे शोधून आरोपींना जास्तीत जास्त सजा होण्यासाठी पोलीस बारकाईने तपास करत आहेत. यामध्ये कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्यास त्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल या अटीवर त्यांनी तपासामध्ये सहकार्य करावे असे पोलिसांनी आव्हान केले आहे.