स्थानिक

बारामतीचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांची बदली

पंकज भुसे यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती

बारामतीचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांची बदली

पंकज भुसे यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती

बारामती वार्तापत्र

बारामतीचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांची अखेर बदली झाली आहे. महेश रोकडे यांच्या जागी आता नगर परिषद संचानालयाचे सहाय्यक आयुक्त पंकज भुसे यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सप्टेंबर 2021 ते मार्च 2025 पर्यंत बारामतीचे मुख्याधिकारी म्हणून महेश रोकडे यांनी काम पाहिले.

नांदेड, इंदापूर, विटा, शिरूर येथे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिलेल्या महेश रोकडे यांनी तत्पूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या कार्यकाळात बारामतीत विविध विकासकामांची जोड मिळाली. शहर सुशोभीकरणाच्या कामाला गती मिळाली. विशेषतः कोरोनाच्या काळातही त्यांनी उल्लेखनीय काम केले.

मुरुड नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम केल्यानंतर पंकज भुसे यांची नवी मुंबई संचालनालयात सहाय्यक संचालकपदी पदोन्नती झाली होती. मुरुडच्या नगरपालिकेचा पदभार त्यांनी सप्टेंबर 2021 ते सप्टेंबर 2024 या तीन वर्षात सांभाळला. भुसे यांच्या काळात मुरुड शहराचा विविध विकासकामांनी कायापालट झाला. नगरपरिषदेच्या इमारतीचे नूतनीकरण, विश्रामगृह, सर्व नगरपरिषदांच्या शाळांचे नुतनीकरण, शाळांचे संगणकीकरण, अग्निशमन कार्यालय, नगरोत्थान योजनेअंतर्गत वेगवेगळी विकास कामे करून घेण्यात पंकज भुसे यांनी मोठी भूमिका बजावली होती.

कालच बारामती नगर पालिकेचे नगररचनाकार विकास ढेकळे यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने रंगेहात पकडल्याने या घटनेची जोरदार चर्चा आज दिवसभर बारामतीत रंगल्याचे पाहायला मिळाले.

Related Articles

Back to top button