बारामतीच्या एंट्री पॉईंटवर सीसीटीव्हीची नजर
बारामती शहर पोलिसांचा उपक्रम
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर बारामती शहर पोलिसांच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. बारामती शहरातील दुचाकी व चारचाकी गाड्यांच्या चोऱ्या रोखण्यासाठी व इतर प्रकारच्या गुन्ह्यांसाठी, अपघातातील वाहनावर देखरेख करण्यासाठी, वाहन ओळखण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
बारामती शहरात प्रवेश करणाऱ्या इंदापूर रोड, गुणवडी रोड ,फलटण रोड ,निरा रोड ,मोरगाव रोड ,पाटस रोड, भिगवण रोड अशा रस्त्यांनी बारामती शहराला जोडले गेले आहे या सर्व रस्त्यांवरील टोल नाके व इतर मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत या कॅमेर्यांची दृश्य टिपण्याची क्षमता उत्कृष्ट असणार आहे व हे कॅमेरे नाईट व्हिजन मोडचे , कितीही अंधारात अचूक दृश्य कॅमेऱ्यात कैद होणार आहेत.
शहराच्या सर्व मुख्य रस्त्यांवर बसवलेले कॅमेरे बारामती शहर पोलीस स्टेशन मधून नियंत्रित करता येणार आहेत. याठिकाणी या कॅमेर्याने टिपलेल्या हालचालींवर 24 तास लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा माग घेण्यासाठी पोलिसांना सोयीचे ठरणार असुन गुन्हेगारांवर वचक बसणार आहे.
हे सर्व कॅमेरे बसविण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पीआय नामदेव शिंदे यांनी लोकवर्गणीतून हे कॅमेरे बसवण्याचे नियोजन केले आहे.
या मदत मोहिमेला नागरिकही मोठा हातभार लावतील, कारण नामदेवराव शिंदे यांनी सूत्रे हातात घेतल्यापासून सामान्य माणसाला सुरक्षित पणाची भावना वाढू लागले आहे.आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ही मदत केल्यास येणाऱ्या काळात निश्चितच चांगले परिणाम दिसणार आहेत.