स्थानिक

बारामतीच्या औद्योगिक विकासासाठी सहकार्य करणार – अमर साबळे माजी राज्यसभा खासदार

प्रस्तावांच्या मंजुरीसाठी आपण वैयक्तिक पाठपुरावा करू

बारामतीच्या औद्योगिक विकासासाठी सहकार्य करणार – अमर साबळे माजी राज्यसभा खासदार

प्रस्तावांच्या मंजुरीसाठी आपण वैयक्तिक पाठपुरावा करू

बारामती वार्तापत्र 

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे उद्योग क्षेत्रामधील भरीव कार्य कौतुकास्पद असून त्यांनी केंद्र सरकारकडे दाखल केलेल्या प्रस्तावांच्या मंजुरीसाठी आपण वैयक्तिक पाठपुरावा करू व बारामती परिसरातील उद्योगांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देऊ अशी ग्वाही बारामतीचे सुपुत्र राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी दिली.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या एमआयडीसीतील कार्यालयास अमर साबळे यांनी सदिच्छा भेट देऊन उद्योजकांशी संवाद साधला त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबीरशाह शेख, कार्यकारणी सदस्य महादेव गायकवाड, संभाजी माने, विष्णुपंत दाभाडे, उद्योजक रघुनाथ दाभाडे, महादेव शिंदे, महेंद्र जाधव, नारायण झगडे, अनिल काळे, पंडित रणदिवे अभिजीत थोरात आदींनी संवाद साधला. अमर साबळे यांच्या समवेत नवी दिल्लीतील राजकीय रणनीतीकार राजेश शुक्ला, अक्षय जोशी, प्रिन्स त्यागी, मधू त्यागी, रवींद्र अंजनकर, बारामतीतील ज्येष्ठ नेते सुभाष ढोले, दिलीप शिंदे, किशोर काशीद उपस्थित होते.

धनंजय जामदार म्हणाले बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून या परिसरातील औद्योगिक विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असून अनेक प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केले आहेत.

यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय कामगार मंत्रालयाने मंजूर केलेले इएसआयसी हॉस्पिटलची क्षमता शंभर बेड ऐवजी दोनशे बेड करणे, ड्रायपोर्टची निर्मिती करणे, बारामती ते मुंबईला थेट रेल्वे सेवा सुरू करणे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रेल्वे,संरक्षण अशा विभागांची बारामतीतील उद्योजकांना वेंडरशिप मिळून देण्यासाठी प्रयत्न करणे आदी प्रस्ताव दाखल केले आहेत.

अमर साबळे म्हणाले केंद्र शासनाकडे बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने दाखल केलेल्या प्रस्तावांवर सकारात्मक कार्यवाही करण्यासाठी आपण वैयक्तिक पाठपुरावा करून बारामतीच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी योगदान देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Back to top button