क्राईम रिपोर्ट

बारामतीतील खाजगी कोचिंग क्लास चालवणाऱ्यांना ५० लाखाची खंडणीची मागणी करणाऱ्या इसमास अटक

26/05/2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

बारामतीतील खाजगी कोचिंग क्लास चालवणाऱ्यांना ५० लाखाची खंडणीची मागणी करणाऱ्या इसमास अटक

26/05/2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

बारामती वार्तापत्र

बारामती शहर व परिसरात शैक्षणिक दृष्ट्या वेगवेगळे शाळा, कॉलेजेस तसेच खाजगी कोचिंग क्लासेस निर्माण झाले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील बरेचसे विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी येत असतात.

बारामती शहरातील भिगवण रोड या या ठिकाणी चालू असलेल्या एका खाजगी कोचिंग क्लास चालकास आरोपी नामे मोहसीन अकबर पठाण वय 31 वर्षे रा. सूर्यनगरी बारामती ता. बारामती जिल्हा पुणे याने वेगवेगळ्या सोशल मीडिया साइटवर बदनामीकारक व अश्लील मजकूर असलेले पोस्ट टाकून कोचिंग क्लास चालकास धमकी देऊन त्याचे कडून 50 लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याने त्याचे विरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यामध्ये आरोपी मोहसीन पठाण यास अटक करण्यात आले असून त्यास मा. न्यायालया समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास तारीख 26/05/2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामिण श्री. संदीप सिंह गिल्ल सो. मा.अपर पोलीस अधीक्षक बारामती, श्री.गणेश बिरादार सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती श्री. सुदर्शन राठोड सो. , बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रूपाली पवार या तपास करीत आहेत.

Related Articles

Back to top button