बारामतीच्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे UPSC मध्ये यश (प्रज्वल पोळ याला अखिल भारतीय क्रमांक 434; IRS (Income Tax) सेवेत संधी मिळण्याची शक्यता)
कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे फलित असून महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब

बारामतीच्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे UPSC मध्ये यश (प्रज्वल पोळ याला अखिल भारतीय क्रमांक 434; IRS (Income Tax) सेवेत संधी मिळण्याची शक्यता)
कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे फलित असून महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब
बारामती वार्तापत्र
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथील माजी विद्यार्थी प्रज्वल राजू पोळ (बॅच 2018–2022) याने संघ लोकसेवा आयोगाच्या UPSC परीक्षेत अखिल भारतीय क्रमांक (AIR) 434 मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या यशामुळे त्याला भारतीय राजस्व सेवा (IRS – Income Tax) मध्ये अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रज्वल पोळ याचे हे यश त्याच्या कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे फलित असून महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
महाविद्यालयात कार्यरत असलेल्या डॉ. शरदचंद्रजी पवार कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सुविधा, मार्गदर्शन व अभ्यासाचे योग्य वातावरण उपलब्ध करून दिले जाते.
तसेच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी (Alumni) नेटवर्कमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा व मार्गदर्शन मिळत असते.
या यशाबद्दल ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन मा. श्री राजेंद्रदादा पवार, विश्वस्त मा. सौ. सुनंदा पवार, श्री. विष्णुपंत हिंगणे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री नलावडे सर, उपप्राचार्य मा. श्री संदीप गायकवाड तसेच डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथील प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






