बारामतीच्या कोरोना लढ्यासाठी लंडनवरून मिळाली मदत

एक लाख रुपये देऊन आपले मातीशी ऋणानुबंध कायम ठेवले आहेत त्यामुळे बारामतीतून त्यांचे कौतुक होत आहे

बारामतीच्या कोरोना लढ्यासाठी लंडनवरून मिळाली मदत 

एक लाख रुपये देऊन आपले मातीशी ऋणानुबंध कायम ठेवले आहेत त्यामुळे बारामतीतून त्यांचे कौतुक होत आहे.

बारामती वार्तापत्र

शहरात कोरोनाचे वाढते थैमान आणि वाढती रुग्ण संख्या यामुळे सर्वच यंत्रणांनी धास्ती घेतली आहे. अनेक वेळा लॉक डाऊन ही करण्यात आले अशातच एक दिलासादायक बाब समोर आली.

बारामती येथील प्रसिद्ध डॉक्टर रवींद्र राजे यांचा मुलगा डॉक्टर गौतम राजे हे लंडन येथे वैद्यकीय सेवा बजावत आहेत बारामती मधील वाढती रुग्ण संख्या पाहून त्यांनी लंडन येथून एक लाख रुपयांची मदत बारामतीत पाठवली आहे डॉक्टर गौतम राजे यांनी सामाजिक जाणिवेतून आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो या उदात्त हेतूने त्यांचे बारामतीतील मित्र आनंद छाजेड यांच्या बँक अकाउंट वर एक लाख रुपये पाठवून दिले या एक लाख रुपये यातून बारामतीतील रुग्णालयांना आवश्यक असलेले बारा स्ट्रेचर खरेदी करण्यात आले.

बारामतीतील डॉक्टर रवींद्र राजे हे प्रख्यात डॉक्टर आहेत त्यांचं ही नेहमी समाजासाठी योगदान असतं त्या पाठोपाठ आता लंडन स्थित त्यांच्या मुलाने एक लाख रुपये देऊन आपले मातीशी ऋणानुबंध कायम ठेवले आहेत त्यामुळे बारामतीतून त्यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Back to top button