बारामतीच्या डोर्लेवाडीत केतकी चितळेचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांनी केला रास्ता रोको करत जाहीर निषेध..
तिच्यावर अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे देखील दाखल झाले आहेत.
बारामतीच्या डोर्लेवाडीत केतकी चितळेचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांनी केला रास्ता रोको करत जाहीर निषेध..
तिच्यावर अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे देखील दाखल झाले आहेत.
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी केतकी चितळे या अभिनेत्रीने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे आज बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बिकेबीएन रोडवर रास्ता रोको करत जाहीर निषेध करण्यात आला.. यावेळी केतकी चितळे च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली… यावेळी अशोक नवले, अविनाश काळकुटे, राजेंद्र गावडे, बाळासाहेब सरोदे, कांतीलाल काळकुटे, कांतीलाल नाळे, विनोद नवले, गजानन नाळे, रामभाऊ कालगावकर, अजित वामन, जावेद शेख, मनोज काळोखे, किसन जाधव, भगवान शिरसागर, दत्तात्रेय लोणकर, बाळासाहेब फरतडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट – केतकी चितळे या अभिनेत्रीने याअगोदर अनेक वेळा वादग्रस्त पोस्ट शेअर करत अनेक जणांचा रोष ओढवून घेतलेला आहे. त्याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत तिच्यावर अट्रोसिटी सारखा गुन्हा देखील दाखल आहे आणि आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे तिच्यावर अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे देखील दाखल झाले आहेत. यामुळे केतकी चितळेची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.