बारामतीच्या नगरपरिषदेचे राजकारण तापल; मेहरबान कोर्टाचा दणका!
तीन उमेदवारांचे अर्ज दाखल करून घेण्याचा दिला निकाल

बारामतीच्या नगरपरिषदेचे राजकारण तापल; मेहरबान कोर्टाचा दणका!
तीन उमेदवारांचे अर्ज दाखल करून घेण्याचा दिला निकाल
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाची घडामोड घडली आहे.नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या तीन उमेदवारांचे अर्ज उपस्थित असूनही स्वीकारण्यास निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नकार दिल्यानंतर हा मुद्दा थेट न्यायालयापर्यंत पोहचला. अखेर न्यायालयाने या तिन्ही उमेदवारांच्या बाजूने निकाल देत त्यांच्या अर्जांना स्वीकार करण्याचे आदेश जारी समजले.
काय घडले?
बारामती नगरपालिका निवडणुकीसाठी ऍड. अविनाश गायकवाड,सतीश फाळके,अलीअसगर फक्रुद्दीन नगरवाला हे तिन्ही उमेदवार नियमानुसार अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचले. त्याच वेळी प्रादेशिक पक्ष यांचे तब्बल ४१ नगरसेवक एकाच वेळी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल झाले.
या गर्दीत आणि परिस्थितीत उपस्थित असूनही वरील तिघांचे अर्ज वेळ संपली असल्याचे कारण सांगून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे तिघांनीही याला विरोध दर्शवत थेट ‘मेहरबान कोर्टा’मध्ये (मजिस्ट्रेट कोर्ट) तक्रार दाखल केली.
न्यायालयाचा निकाल
तक्रार ऐकल्यानंतर न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय चुकीचा ठरवत मोठा दिलासा दिला.न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले की—“वरील तिन्ही उमेदवारांचे अर्ज तात्काळ स्वीकारून घ्यावेत.”यामुळे या उमेदवारांचा निवडणुकीतून बाहेर राहण्याचा धोका टळला असून पुढील निवडणूक आता रंगतदार होण्याची शक्यता वाढली आहे.






