इंदापूरात वादग्रस्त स्टेटसमुळे तरुणावर गुन्हा
गावकऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे

इंदापूरात वादग्रस्त स्टेटसमुळे तरुणावर गुन्हा
गावकऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे
इंदापूर प्रतिनिधी –
मोबाईलवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याप्रकरणी अक्रम रशीद कुरेशी, रा.कुरेशी गल्ली,इंदापूर या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर कडक कारवाई करण्यात व्हावी या मागणीसाठी शेकडो युवकांनी रात्री उशिरापर्यंत इंदापूर पोलिस स्टेशन समोर ठिय्या मांडला होता.
याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे पुणे विभागाचे सहमंत्री व भाजपचे शहराध्यक्ष किरण गानबोटे यांनी फिर्याद दिली.दरम्यान, गावकऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी केले आहे.