बारामतीच्या म.ए.सो. विद्यालयाचे शिष्यवृत्तीत घवघवीत यश
विद्यालयाची निसर्गा बारवकर राज्यात चौदावी ; तर चोवीस विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

बारामतीच्या म.ए.सो. विद्यालयाचे शिष्यवृत्तीत घवघवीत यश
विद्यालयाची निसर्गा बारवकर राज्यात चौदावी ; तर चोवीस विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
बारामती वार्तापत्र
बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै. ग. भि. देशपांडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवत विद्यालयाचे नाव तालुक्यात उज्ज्वल केले आहे. विद्यालयाची कु.बारवकर हिने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८वी) मध्ये शहरी राज्य गुणवत्ता यादीत १४ वा क्रमांक व तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे. तसेच इयत्ता ५ वीचे १२ व ८ वीचे १२ असे एकूण २४ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत येऊन महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत , तर विद्यालयाचे एकूण ११५ विद्यार्थी ही परीक्षा पात्र झाले आहेत .तालुक्यात सर्वाधिक जास्त याच विद्यालयाचे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत .
*पाचवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी :* *वेद हेमाडे (२६० गुण), संस्कृती घोरपडे ( २५६ गुण ) , वेदांग इंगळे( २५४ गुण ) , शिवरूप घाडगे (२५४ गुण) , वेदांत शहाणे (२५४ गुण ) , अथर्व सोनवणे (२५० गुण ) , प्रथमेश साबळे (२४४) , पूर्वा चांदगुडे (२३६) ,आरुष शेंडगे (२३४) , अधिराज लोणकर (२२८) , शौर्य महाजन (२२६) , अक्षया मोरे(२२०) ;
*आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी* :निसर्गा बारवकर (२७४), प्रतिज्ञा कांबळे (२६६) , जानवी रेवगे(२६६), कार्तिकी कचरे ( २४२), गिरिजा देशमुख ( २२८) , सानवी पवार (२२२), गायत्री निंबाळकर (२१८), अवधूत बाबर (२१४,)भक्ती बेंद्रे (२१४), अक्षता ठोंबरे (२१८) , सई कुमठेकर (२१२), आलिया बागवान ( २१०) . या यशस्वी विद्यार्थ्यांना श्री .संतोष बरळ , श्री.संतोष शेळके , श्री.राजेंद्र जगताप , श्री.शंकर घोडे , श्री.रवींद्र गडकर, श्री.संजय आटोळे, श्री.मधुकर राठोड , श्री.दिपक गायकवाड ,श्री.अभिमन्यू गंभीरे , सौ.मेधा चिंधे, सौ.सविता सणगर यांनी मार्गदर्शन केले होते .
सर्व यशस्वी विद्यार्थी , मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे नियामक मंडळ अध्यक्ष बाबासाहेब शिंदे , शाला समितीचे अध्यक्ष अजयजी पुरोहित , महामात्र डॉ.गोविंद कुलकर्णी, सर्व स्थानिक सल्लागार समिती व शाला समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी, विद्यालयाचे मुख्याध्यापक धनंजय मेळकुंदे व शालेय पदाधिकारी .शिक्षकवृंद, पालकवर्ग यांनी अभिनंदन केले.