बारामतीच्या राजनंदीनी शिंदे चे अबैकस च्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश
गणित विषयात १०० हुन अधिक समीकरणे फक्त ४ मिनिटात

बारामतीच्या राजनंदीनी शिंदे चे अबैकस च्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश
गणित विषयात १०० हुन अधिक समीकरणे फक्त ४ मिनिटात
बारामती वार्तापत्र
गतवर्षी अबैकस च्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये लागोपाठ तिसरा व दुसरा नंबर पटकवणाऱ्या बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान इंग्लिश मेडीयम स्कूल (सीबीएसई) इयत्ता ४ थी मधील राजनंदीनी हर्षवर्धन शिंदे हिने २०२५-२६ राष्ट्रीय स्पर्धे मध्ये देशभरातून विविध राज्यातून आलेल्या विद्यार्थामधून पहिला क्रमांक पटकाविला आहे.
या प्रसंगी सुप्रसिध्द सिने अभिनेता श्रेयस तळपदे व किरण पाटील यांच्या हस्ते बक्षिस समारंभ सातारा येथे संपन्न झाला.
या प्रसंगी अबैकस क्षेत्रातील देशातील तज्ञ प्रशिक्षक,विश्वस्त व मान्यवर उपस्तीत होते.
गणित विषयात १०० हुन अधिक समीकरणे फक्त ४ मिनिटात सोडवणाऱ्या ९ वर्षाच्या राजनंदीनी हिने नॅशनल लेव्हल मध्ये तिच्या पेक्षा मोठ्या गटातून सुद्धा सर्वात जास्त गुण मिळवत सर्वत्तम कामगीरी करत उत्कृष्ठ अत्बल पुरस्कार स्वरुपात साईकल जिंकली आसून ग्रामीण भागातील व कमी वयात यश मिळवणारी विद्यार्थिनी म्हणून राजनंदिनी हिचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
तिला अबैकसच्या शिक्षिका सोनादी उमेश लोंढे हो तिचे आईवडील यांनी मार्गदर्शन केले.
गणित विषय आवडीचा आहे अबैकस मुळे गणित सोडविणे सोपे झाले आता जागतिक क्षेत्रात अबैकस विषयी अधिक ज्ञान मिळवून बारामती चे नाव जागतिक पटलावर न्यावयाचे असल्याचे राजनंदिनी शिंदे हिने बक्षिस स्वीकारल्यावर मनोगत मध्ये सांगितले.






