
बारामतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
वाढती आकडेवारी चिंताजनक
बारामती वार्तापत्र
कोरोणाचे प्रमाण वाढत असतानाच काल बारामतीतील एका वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यास कोरोणाची लागन झाली आहे त्यामुळे आता सर्वांनीच काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्यावर्षी मार्चपासून बारामतीतील हे अधिकारी कोरोना नियंत्रणात राहण्यासाठी अत्यंत तत्परतेने काम करत होते. त्यामुळे कोरोना नियंत्रणात राहिला होता. मात्र आज या वरिष्ठ अधिकाऱ्यास कोरोना ची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
मागील काही दिवसापासून सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीचे फॉर्म भरणे साठी प्रचंड प्रमाणात उमेदवारांनी केलेली गर्दी तसेच आता जे जे लोक या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी तातडीने स्वतःची चाचणी करावी असेही बोलले जात आहे. या अधिकाऱ्याच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या तपासणी केल्या हे सर्व कर्मचारी निगेटिव आले आहेत