बारामतीच्या सुपुत्राची मुंबईत कामगिरी, बारामतीत झाला जंगी सत्कार
फिरोज जाफर भाई बागवान यांची पोलिस उपायुक्त पदी बढती
बारामतीच्या सुपुत्राची मुंबईत कामगिरी, बारामतीत झाला जंगी सत्कार
फिरोज जाफर भाई बागवान यांची पोलिस उपायुक्त पदी बढती
बारामती वार्तापत्र
बारामतीचे नाव राजकीय क्षेत्रात संपूर्ण राज्यात अग्रेसर आहेच मात्र आता पोलीस दलातही हे नाव गाजत आहेत त्याचं कारणही तसंच आहे. बारामतीचे सुपुत्र फिरोज जाफरभाई बागवान यांची नुकतीच पोलिस उपायुक्त पदी मुंबईत बढती झाली आहे.
बागवान हे सामान्य कुटुंबातून पुढे जात त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. सामान्य नागरिकाला पोलीस स्टेशनला आल्यावर सन्मानाची वागणूक द्यायची आणि त्याच्या अडचणी सोडवायच्या हे प्रथम कर्तव्य ते मानत असतात. त्यांनी आजपर्यंत अनेक पोलीस स्टेशनमध्ये इन्चार्ज म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना पोलीस खात्यातील अनुभवही मोठा आहे.
फिरोज बागवान यांचे वडील जाफर भाई हे बारामतीत तरकारी विक्रीचा व्यवसाय करत होते. मात्र आपल्याला जे कष्ट पडत आहेत त्यातून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना मोठे अधिकारी बनवण्याचे स्वप्न पाहिले.आणि त्यांचे स्वप्न त्यांच्या मुलांनी साकार केले. फिरोज बागवान यांचे एक भाऊ पोलीस खात्यातच आहेत तर दुसरे असीफ बागवान हे बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष होते. त्यांच्या या यशात यांच्या आईचाही सिंहाचा वाटा असल्याचे फिरोज बागवान आवर्जून सांगतात.
1989 साली पीएसआय पदापासून सुरुवात करत आज ते पोलिस उपायुक्त पदी पोहोचले आहेत.
त्यांच्या या यशामुळे बारामतीतील उद्योजक ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करत मोठया कष्टाने सना इंडस्ट्रीजची उभारणी बारामतीत केली. समाजातील सामान्य गरीब व होतकरू लोकांना ते मदत करत असतात. असे असलम हुसेन बागवान व समस्त बारामतीकर मुस्लिम समाजाच्या वतीने फिरोज जाफर भाई बागवान यांच्या सत्काराचे आयोजन बारामतीच्या सावित्रीबाई फुले भवन मध्ये केले होते.या कार्यक्रमाला बारामती नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांच्यासह बारामतीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.