बारामतीतही एका कोरोना योध्द्यांकडून दुस-या कोरोनायोध्द्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अनौपचारिक कार्यक्रम आज झाला.
कोरोनाशी दोन हात करणा-या कोरोना योध्द्यांप्रती समाजातील सन्मानाची भावनाही वाढीस लागली.

बारामतीतही एका कोरोना योध्द्यांकडून दुस-या कोरोनायोध्द्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अनौपचारिक कार्यक्रम आज झाला.
कोरोनाशी दोन हात करणा-या कोरोना योध्द्यांप्रती समाजातील सन्मानाची भावनाही वाढीस लागली.
बारामती वार्तापत्र
18 मार्च पासून सलगपणे कोरोनाशी दोन हात करण्यात सगळ्यात आघाडीवर असलेल्या बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना आज पोलिसांच्या वतीने चहापान व नाश्ता दिला गेला. कारण काहीही नव्हते, पण गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा छोटेखानी सोहळा झाला.
उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील, सहायक पोलिस निरिक्षक योगेश शेलार, फौजदार पद्मराज गंपले यांनी रस्त्यावर उतरुन काम करणा-या सर्वच आरोग्य विभागाच्या व नगरपालिकेच्या कायमस्वरुपी तसेच कंत्राटीही कर्मचा-यांशी आज सकाळी मनमोकळा संवाद साधला.
पोलिसांप्रमाणेच तुम्हीही प्रत्यक्षपणे या संकटाच्या काळात समाजासाठी काम करता आहात, तुम्हीही स्वताःची आणि कुटुंबाची काळजी घ्यायला हवी, आरोग्यविषयक सर्व बाबींची माहिती इतरांनाही द्यावी, मास्कचा वापर, सॅनेटायझर्स व ग्लोव्हजचा वापर नियमित करावा या सूचना शिरगावकर व पाटील यांनी या वेळी दिल्या. तुम्ही जे काम करता आहात, त्याचा बारामतीकरांना अभिमान वाटतो, अशा शब्दात त्यांच्या पाठीवर पोलिसांनी कौतुकाची थाप मारली.