स्थानिक

बारामतीतील उद्योजकांसाठी हैदराबाद अभ्यास दौरा

भव्य औद्योगिक प्रदर्शन

बारामतीतील उद्योजकांसाठी हैदराबाद अभ्यास दौरा

भव्य औद्योगिक प्रदर्शन

बारामती वार्तापत्र 

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने बारामती परिसरातील उद्योजकांसाठी हैदराबाद येथे HITEX – हैदराबाद इंटरनेशनल ट्रेड एक्सपोझिशन एक्सहिबिशन सेंटर येथे आयोजित भव्य औद्योगिक प्रदर्शन पाहण्यासाठी २० ते २३ ऑगस्ट दरम्यान अभ्यास दौरा आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली आहे.

हैदराबादमध्ये देश विदेशातील अत्याधुनिक मशीनरी चे उत्पादक त्यांचे विविध उत्पादने वेळोवेळी प्रदर्शित करत असतात.

आत्ताच्या प्रदर्शनामध्ये प्रोसेस इंजीनियरिंग, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, बायो एनर्जी, इफ्युलेंट ट्रीटमेंट , एयर पोल्युशन आणि रीसाइक्लिंग क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण लहान मोठ्या मशीनरी एकाच ठिकाणी पाहण्याची संधी उद्योजकांना उपलब्ध झाली आहे.

देशातील नामांकित मशीनरी उत्पादकांबरोबरच परदेशी कंपन्या देखील यात सहभागी होणार असल्याने जागतिक दर्जाच्या यंत्रसामग्री उद्योजकांना पाहण्यास मिळणार आहेत.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली उद्योजकांची शिष्टमंडळ २० ऑगस्ट रोजी हैदराबादला रवाना होणार असून प्रदर्शनासह हैदराबाद परिसरातील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणार आहेत.

स्टार्टअप नवीन उद्योजक व प्रस्थापित उद्योजकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मशिनरीचे उत्पादन प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची उत्तम संधी या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.

या हैदराबाद अभ्यास दौऱ्यात उद्योग व्यावसायिकांना सहभागी व्हायचे असल्यास बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे सचिव अनंत अवचट यांच्याशी 7304715155 या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदण्याचे आवाहन अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button