स्थानिक

बारामतीतील एका डॉक्टराकडून ओटीपी घेत त्यांची सुमारे ३ लाख ३२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक.

सात ते आठ मिनिटातच रक्कम कपात.

बारामतीतील एका डॉक्टराकडून ओटीपी घेत त्यांची सुमारे ३ लाख ३२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक.

सात ते आठ मिनिटातच रक्कम कपात.

बारामती:वार्तापत्र 

तुम्ही वापरत असलेल्या पेटीएमचे केवायसी अपूर्ण असल्याचे सांगत बारामतीतील एका डॉक्टराकडून ओटीपी क्रमांक घेत त्यांची सुमारे ३ लाख ३२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात राकेश मल्होत्रा या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉ. महेंद्र रमणलाल दोशी (वय६७)यांनी याबाबत फिर्याद दिली.

फिर्‍यादीनुसार, दोशी यांचे शहरात रमण हॉस्पिटल आहे. त्यांची ॲक्सिस बॅंक व आयसीआयसीआय बॅंकेत खाती आहेत. ॲक्सिस बॅंकेत पती-पत्नीच्या नावे सलग्न खाते आहे. आयसीआयसीआय बॅंकेच्या खात्याद्वारे ते पेटीएम  ॲप वापरतात. दि. २९ जुलै रोजी त्यांच्या बॅंकेकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाईलवर ९६४११७८५११ या क्रमांकावरून फोन आला. मोबाईलधारकाने त्याचे नाव राकेश मल्होत्रा असे सांगत पेटीएम ॲप कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे पेटीएमची केवायसी पेपर अपूर्ण आहेत. त्यामुळे पुढील २४ तासात ते बंद होईल. हे ॲप चालू ठेवण्यासाठी, केवायसी पूर्ण करण्यासाठी मी सांगतो त्याप्रमाणे करा, असे त्याने सांगितले. त्यानुसार गुगल प्ले स्टोअरवरून क्विक सपोर्ट ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. या ॲपमध्ये आलेला आयडी क्रमांक त्याने विचारून घेतला. केवायसी अपलोड करण्यासाठी दोशी यांना सात रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यांनी ही रक्कम भरल्यानंतर ॲक्सिस बॅंकेतून तुम्हाला कॉल येईल त्यांना ओटीपी द्या, असे सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळातच ९१२२६००४७७०० या क्रमांकावरून दोशी यांना कॉल आला. ओटीपीची मागणी करण्यात आली. त्यांनी तो दिल्यानंतर लागलीच त्यांच्या व पत्नीच्या खात्यातून पाच ट्रान्झेक्शनद्वारे ३ लाख ३२ हजार रुपये परस्पर कपात करत त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. केवळ सात ते आठ मिनिटातच ही घटना घडली. रक्कम कपात झाल्याचे मेसेज मोबाईलवर आल्यानंतर डॉ. दोशी यांनी तात्काळ बॅंकेत जात खाते उतारा घेतला. तुमची आर्थिक फसवणूक झाली आहे, तुम्ही पोलिस तक्रार द्या,  असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार फिर्य़ाद दाखल करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!