आर एन आगरवाल टेक्निकल विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते.

आर एन आगरवाल टेक्निकल विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा.
सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते.
बारामती वार्तापत्र
आज दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी आर एन आगरवाल टेक्निकल विद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी कु. श्रावणी बोडके व कु. श्रेया डेरे या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले. शौर्य जाधव, विवेक घुले, प्रशांत भुसनर, कु. सिद्धी सस्ते, कु. काव्या नवले, कु.सानिका करवर, कु. समृद्धी गायकवाड, कु. दुर्गा शिंदे या विद्यार्थ्यांनी रमण इफेक्ट, शास्त्रज्ञांचे योगदान आणि विज्ञान शाप की वरदान इत्यादी विषयांवर आपली मनोगत व्यक्त केली.
याप्रसंगी सौ. मीनाक्षी वाघमारे यांनी विज्ञानाची कास धरून तंत्रज्ञानासोबत चालत विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे तसेच चिकित्सक वृत्ती, संशोधक वृत्ती जोपासून आपणही एखादा शोध लावू शकतो अशी जिद्द बाळगली पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.
माननीय प्राचार्य श्री.कल्याण देवडे सर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते.
विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य श्री. कल्याण देवडे , विज्ञान विषय प्रमुख श्री. सावता म्हस्के व गुरुकुल प्रमुख श्री. अरविंद मोहिते , ज्युनिअर विभाग प्रमुख श्री. आनंदराव करे यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्व विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्तुत्य अशी वैज्ञानिक उपकरणे, भौगोलिक साहित्य व गणितीय मॉडेल तयार केले होते.