शैक्षणिक

बारामतीतील जनहित प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थांनी केली बक्षीसांची लयलूट

एक, दोन नव्हे तर तब्बल ५३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत बक्षीसांची लयलूट केली.

बारामतीतील जनहित प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थांनी केली बक्षीसांची लयलूट

एक, दोन नव्हे तर तब्बल ५३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत बक्षीसांची लयलूट केली.

बारामती वार्तापत्र 

बारामतीतील शक्षणिक वर्षाचे अखेरचे दिवस म्हणजे मुले विद्यार्थी न राहता परीक्षार्थी बनून जातात. पण याला अपवाद ठरले जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक विद्यालय निमित्त होते जनहित प्रज्ञाशोध स्पर्धेचे बक्षीस वितरण.

जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक विद्यालयात २०२५-२६ या चालू शैक्षणिक वर्षात जनहित प्रज्ञाशोध परीक्षा या नावाने स्पर्धा घेण्यात आली. विद्यालयातील इ.२ री ते इ.४ थी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. एक, दोन नव्हे तर तब्बल ५३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत बक्षीसांची लयलूट केली. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन प्रमुख पाहुणे व  संस्थेच्या मान्यवर संचालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे यांनी या स्पर्धेविषयी माहिती सांगितली. वर्षभर प्रत्येक महिन्यात एक चाचणी व वर्षाच्या शेवटी अंतिम स्पर्धा परीक्षा घेऊन मूल्यमापन करून विद्यार्थ्यांचे क्रमांक काढले. या स्पर्धेसाठी इयत्तेच्या पाठ्यक्रमातील प्रश्नांसोबत त्या विद्यार्थ्यांच्या वयोगटाला अनुसरून सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारण्यात आले. भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी पूर्वतयारी या स्पर्धेतून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. उत्कर्षा माणिक खेडकर (मंडल कृषी अधिकारी, महाराष्ट्र शासन) या उपस्थित होत्या त्यांनी विदयार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व सांगितले. विशेष म्हणजे प्रमुख पाहुणे विद्यालयाची माजी विद्यार्थिनी असून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातूनच शासकीय कृषी सेवेत नियुक्त झालेली आहे.

असे प्रमुख पाहुणे जनहित प्रज्ञाशोध या स्पर्धा परीक्षेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी लाभले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा.सौ. शिवानीताई अभिजीत देवकाते (जिल्हा परिषद सदस्य, पुणे) यांनी त्यांच्या मनोगतात बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सदर प्रमुख अतिथी विद्यालयाच्या पालक आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष (गुरुकुल) मा. श्री. प्रा. हृषिकेश घारे (सर) यांनी विद्यार्थी व पालक यांचे अभिनंदन करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत माहिती दिली.

या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) मा.श्री.प्रा. हृषीकेश घारे (सर), सचिव मा.श्री.प्रा. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा. श्री. सतीश धोकटे व सर्व संचालक मंडळ तसेच आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक सर्वांनी कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. भाग्यश्री ननवरे तर आभार कु. श्रध्दा कडाळे यांनी मानले.

Back to top button