बारामतीतील जनहित प्रतिष्ठान विद्यालयची कु. स्नेहा रणवरे हिची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड…
७२ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक

बारामतीतील जनहित प्रतिष्ठान विद्यालयची कु. स्नेहा रणवरे हिची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड…
७२ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक
बारामती वार्तापत्र
बारामती तालुकास्तरीय आंतरशालेय कुस्ती स्पर्धा, कुस्ती संकुल बारामती या ठिकाणी पार पडल्या. यामध्ये जनहित प्रतिष्ठान प्राथमिक विद्यालयाच्या कु. स्नेहा रणवरे हिने ७२ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला व कु. समिधा थोरात या खेळाडूने ३६ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक मिळवला. कु. स्नेहा रणवरे हिची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कु. समिधा थोरातने प्रतिस्पर्धी खेळाडूचा जोरदार प्रतिकार केला त्याबद्दल तिला मान्यवरांनी ३०० रु. रोख रक्कम बक्षीस म्हणून दिले. या खेळाडूंना NIS कोच क्रीडा शिक्षक श्री. सचिन नाळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) प्रा.मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव प्रा.मा.श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा.श्री. सतीश धोकटे व सर्व संचालक, गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे आणि विद्यालायातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन व कौतुक केले.