बारामतीतील जळोचीकरांचे अंतर आतां कमी होणार…!
जळोची बांदलवाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न
बारामती वार्तापत्र
विकसित बारामती शहरातील वाढीव हद्दीमध्ये विविध विकास कामांना मंजुरी मिळाली असून मंगळवार रोजी जळोची येथील माजी न्यायाधीश यांच्या बंगल्यापासून बांदलवाडी या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
बारामती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन तीस कोटी रुपयांची विकास कामे शहरात करण्यात येत आहेत.जळोची येथील माजी न्यायाधीश यांच्या बंगल्यापासून बांदलवाडी हा रस्ता केल्याने येथील नागरिकांना बारामती शहरात येण्यास अगदी जवळचा रस्ता होणार असून परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांपासून या रस्त्याची मागणी होत होती.
बारामती शहरांमध्ये राज्य सभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते मंगळवारी १५ रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. जळोची येथील याही रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात येणार होते. परंतु अधिकच्या कार्यक्रमांमुळे आणि दुपारीच आचारसंहिता जाहीर होणार असल्याने, पवार यांनी ग्रामस्थांच्या शुभहस्ते भूमिपूजन समारंभ करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.या कामाचे कंत्राट आदित्य कंस्ट्रक्शन यांना देण्यात आलेले असून काम दर्जेदार,लवकर वेळेत पूर्ण करावे अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
यावेळी माजी न्यायाधीश अमोल वाबळे,बारामती पंचायत समितीचे माजी गटनेते दीपक मलगुंडे,नगरसेवक अतुल बालगुडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंदजगताप, पंचायत समितीचे मा.सभापती संदीप बांदल,प्रकाशराव चव्हाण, धनंजय वाबळे,शिवाजीराव ढवाण,प्रवीण माने, हनुमंतराव तांबे, दिलीपराव शिंदे, प्रमोद ढवाण,ॲड.जी.बी.गावडे, विजय जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.पाहुण्यांचे स्वागत जितेंद्र जाधव यांनी केले.