स्थानिक

बारामतीतील जिजाऊ सेवा संघाच्या वतीने महिला दिन साजरा

मार्गदर्शन शिबीर चे आयोजन केले होते.

बारामतीतील जिजाऊ सेवा संघाच्या वतीने महिला दिन साजरा

मार्गदर्शन शिबीर चे आयोजन केले होते.

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघ यांच्या वतीने रविवार ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कार्यशाळा व मार्गदर्शन शिबीर चे आयोजन केले होते.
ब्युटी पार्लर व उपयोग आणि व्यवसाय संदर्भात अर्चना भोईटे व मेहंदी व्यवसाय उपयोग चे मार्गदर्शन आरती बोकड ,किचन कुकिंग क्लासेस नाजमीन तांबोळी, नथ मेकिंग पिल्लं पल्लवी नाचन यांनी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी बारामती नगरपरिषद च्या मा. नगराध्यक्षा जयश्री सातव व जिजाऊ सेवा संघ च्या मा. अध्यक्षा विजया कदम, बारामती बँक संचालिका कल्पना शिंदे ,व्हेरिटास इंजिनिअरिंग च्या चेअरमन नीलिमा भापकर व जिजाऊ सेवा संघ अध्यक्षा स्वाती ढवाण, उपाध्यक्ष मनीषा शिंदे, कार्याध्यक्ष सुनंदा जगताप ,सहकार्याध्यक्ष भारती शेळके,सचिव कल्पना माने, सह सचिव ऋतुजा नलवडे, खजिनदार मनीषा खेडेकर, सदस्या गौरी सावळेपाटील, वीणा यादव, सुर्वणा केसकर, संगीता साळुंखे, पूजा खलाटे आदी मान्यवर महिला उपस्तीत होत्या.

महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा त्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावे या साठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे अध्यक्षा स्वाती ढवाण यांनी सांगितले.

सूत्रसंचालन मनीषा खेडेकर ,सुनंदा जगताप व आभार प्रदर्शन मनीषा शिंदे यांनी केले.

फोटो ओळ:
जागतिक महिला दीना निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्तीत महिला

Back to top button