बारामतीतील ज्येष्ठ नागरिक निवास तांदुळवाडी च्या अध्यक्ष पदी किशोर मेहता
संस्थेची स्थापना २७ मार्च १९९१
बारामतीतील ज्येष्ठ नागरिक निवास तांदुळवाडी च्या अध्यक्ष पदी किशोर मेहता
संस्थेची स्थापना २७ मार्च १९९१
बारामती: वार्ताहर
ज्येष्ठ नागरिक निवास तांदुळवाडी कै. रघुनाथ गेनबा बोरावके चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्ष पदी किशोर मेहता यांची निवड करण्यात आली असून राजेंद्र रघुनाथ बोरावके ( उपाध्यक्ष ), फखरूद्दीन अब्बासभाई कायमखानी (सेक्रेटरी ), डॉ. सुहासिनी सचिन सातव (खजिनदार ), डॉ. अजिंक्य सर्वदमन राजेनिंबाळकर (सहखजिनदार) पदी निवड करण्यात आली आहे.
बारामती ज्येष्ठ नागरिक निवास या संस्थेची स्थापना २७ मार्च १९९१ मध्ये झालेली आहे संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र रघुनाथ बोरावके यांनी संस्थेस बक्षीस पत्र करून दिलेल्या ३ एकरच्या परिसरात असून यापूर्वी या संस्थेच्या अध्यक्ष पदी कै. जीवाभाई माणिकचंद कोठारी, कै. डॉ.त्रिंबक गणेश अंबर्डेकर व कै मुरलीधर गणपत घोळवे यांनी सामाजिक कार्य केलेले आहे.
संस्थेच्या विश्वस्त व सल्लागार व राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा अजितराव पवार व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित संस्थेच्या मासिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची नव्याने नवनियुक्ती करण्यात आली.