इंदापूर

भिमाई आश्रमशाळेत महामानवाला जयंती दिनी अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी

भिमाई आश्रमशाळेत महामानवाला जयंती दिनी अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी

इंदापूर : प्रतिनिधी

येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली.तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस पुष्प,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेला इंदापूरचे माजी नगरसेवक हरिदास हराळे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल देशमाने व स्नेहल शिंदे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमस्थळी सामूहिक पंचशील, त्रिशरण घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांना पेढे वाटून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणं केली व गीतंही गायली.

यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला रत्नाकर मखरे, कार्याध्यक्ष ॲड.राहुल मखरे, सचिव ॲड.समीर मखरे,संचालक गोरख तिकोटे,संजय कांबळे,अस्मिता मखरे,अश्वजीत कांबळे,वैशाली कांबळे,रज्जूताई मखरे, विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.विद्यार्थी व उपस्थितांना सचिव ॲड.समीर मखरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले तर आभार हिरालाल चंदनशिवे यानी मानले.कार्यक्रम मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button