स्थानिक

बारामतीतील टी सी कॉलेज मैदानावर पोलिसांचे जमाव पांगवण्यासाठी प्रशिक्षण..!

लाठीचार्ज कसा करावा तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या बाबत

बारामतीतील टी सी कॉलेज मैदानावर पोलिसांचे जमाव पांगवण्यासाठी प्रशिक्षण..!

लाठीचार्ज कसा करावा तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या बाबत

बारामती वार्तापत्र

आगामी रमजान ईद व अक्षय तृतीया तसेच धार्मिक स्थळावरील भोंग्या चे आवाज संदर्भातील वातावरणा मध्ये बारामती पोलीस उपविभागात येणाऱ्या सर्व पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी आज सकाळी टी सी कॉलेज मैदानावर सकाळी आठ ते साडेदहा वाजेपर्यंत राईट स्कीम राबविण्यात आली.

तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या करता जमाव पांगवण्यासाठी परेडची उजळणी घेण्यात आली. यामध्ये आणीबाणीची वेळ आल्यास इतर पोलिस ठाणे यांचे कडून तात्काळ किती वेळात मदत दिली जाते तसेच फायर ब्रिगेड वैद्यकीय मदत पोलीस स्टेशन यांच्यामध्ये समन्वय राहून घटनास्थळी किती वेळात पोहोचतात याची चाचणी घेण्यात आली.

लाठीचार्ज कसा करावा तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या बाबत पोलिसांना प्रशिक्षण मुख्यालया कडील राखीव पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत देण्यात आले.

सदरचे प्रशिक्षण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख व अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या आदेशान्वये व बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले यावेळी बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तैयबु मुजावर वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन चे प्रभारी सोमनाथ लांडे वालचंद नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी बीराप्पा लातूरे तसेच भिगवण पोलिस स्टेशनचे प्रभारी पवार व सर्व पोलीस स्टेशन चा स्टाफ शिग्र कृती दल असे मिळून 100 जवान हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram