बारामतीतील टेक्निकल मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीचे मनोगते सादर केली

बारामतीतील टेक्निकल मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीचे मनोगते सादर केली
बारामती वार्तापत्र
बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री भगवान भिसे ,उपमुख्याध्यापक श्री. सतीश पाचपुते, पर्यवेक्षिका सौ. अलका चौधर, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आठवी ब चे विद्यार्थी कु. संस्कृती दळवे,सार्थक थोरात,सिद्धी मोरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविषयीची माहिती दिली .
त्याच पद्धतीने इतर अनेक विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीचे मनोगते सादर केली. विद्यालयातील उपशिक्षक श्री विकास जाधव सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील संघर्षमय परिस्थिती वर्णन करत त्या परिस्थितीवर मात करत त्यांनी बहुजन समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाची अनेक उदाहरणे दिली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य भगवान भिसे यांनी भारतीय राज्यघटने मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान स्पष्ट करत बहुजन समाजाला शिका ,संघटित व्हा, आणि संघर्ष करा या शिकवणुकीची माहिती त्यांनी दिली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी कुंभार व कु .संघमित्रा खरात हिने केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाविषयी प्रश्नमंजुषा सादर करण्यात आली.






