शैक्षणिक

बारामतीतील टेक्निकल विद्यालयातील श्री निंभोरे ३४ वर्ष सेवा करून सेवानिवृत्त

रयत बँकेतर्फे चांदीचे नाणे देऊन त्यांचा सत्कार

बारामतीतील टेक्निकल विद्यालयातील श्री निंभोरे 34 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त

रयत बँकेतर्फे चांदीचे नाणे देऊन त्यांचा सत्कार

बारामती वार्तापत्र

बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेशाम एन.आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयातील श्री रोहिदास निंबोरे यांचा सेवानिवृत्ती समारंभ पार पडला. श्री निंभोरे हे या विद्यालयात गेली 34 वर्ष शिपाई या पदावर ती कार्यरत होते.

24 फेब्रुवारी 1992 रोजी ते या विद्यालयांमध्ये शिपाई या पदावरती नोकरीस लागले होते, गेली 34 वर्षे ते या एकाच विद्यालयामध्ये प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत असताना नियत वयोमानानुसार ते 28 फेब्रुवारी 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

त्यांच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूलचे प्राचार्य श्री गणपत तावरे सर उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री भगवान भिसे होते.यावेळी विद्यालयामार्फत तसेच रयत बँकेतर्फे चांदीचे नाणे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रावसाहेब विरकर यांनी केले तर अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्री निंभोरे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली .

तसेच प्रमुख पाहुणे श्री गणपत तावरे साहेब यांनी श्री निंभोरे यांच्या विषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या सेवेबद्दल त्यांना धन्यवाद दिले. सत्कारमूर्ती श्री रोहिदास निंभोरे यांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या सेवाकाळात असणाऱ्या सर्व सेवकांचे व मुख्याध्यापकांचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षिका सौ. अलका चौधर मॅडम यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विकास जाधव यांनी केले.सदर कार्यक्रमाचे नियोजन उपमुख्याध्यापक श्री सतीश पाचपुते यांनी केले.प्रसंगी सर्व आजी माजी सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button