बारामतीतील तरूणांचा अनोखा उपक्रम,गेल्या एक महिन्यापासून कोविड रुग्णांना पुरवतायत दोनवेळसचे जेवण
जेवणाचा दर्जा अतिशय उत्तम व चविष्ट

बारामतीतील तरुणांचा कौतुकास्पद उपक्रम,कोरोना रुग्णांसह नातेवाईकांच्या हि दोनवेळसचे जेवण
जेवणाचा दर्जा अतिशय उत्तम व चविष्ट
बारामती वार्तापत्र
कोरोना संसर्ग दिवसें दिवस वाढतच चालला आहे . त्यामुळे कोरोना युध्दाच्या लढाईत सर्वच आपआपल्या परीने मदत , सहकार्य करत आहेत .
बारामतीत रूग्णसंख्या झपाटयाने वाढताना दिसत आहे . त्याच बरोबर लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय बंद पडले आहेत . अशातच नागरीकांना कोरोनाने घट्ट विळखा घातला असल्यामुळे नागरीकांचे आर्थिक व शारीरीक कंबरडे पुर्णतः मोडून गेले आहे .
अशा गंभीर परिस्थीतीत बारामतीतील काही दानशूर मंडळींनी रूग्णांसाठी दोन वेळच्या जेवणाची जबाबदारी स्विकारून उत्तमपणे पार पाडत आहेत . बारामती शहरातील शासकिय सिल्व्हर जवळपास २०० रूग्ण कोरोनाच्या उपचारासाठी सिल्वर ज्युबिली हॉस्पीटलमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट रूग्ण दाखल आहेत . बरेच रूग्ण अत्यवस्थ अवस्थेत आहेत .
त्यांचे नातेवाईक खुप घाबरलेल्या मनस्थितीत आहेत . बरेच रूग्ण बारामती बाहेरील व ग्रामीण भागातील सुध्दा आहेत . अनेक रूग्णांचे नातेवाईक सुध्दा सोबत नाहीत . अशा रूग्णांना दोन वेळच्या जेवणाचा फार मोठा आधार बारामतीतील ध्येयवेडया दानशूर तरूणांनी दिला आहे . समाजाप्रती आपले काही देणे लागतो या भावनेपोटी सामाजिक बांधीलकी ओळखुन अन्नदान श्रेष्ठदान समजुन रोज दोन वेळेस सामुहिक वर्गणी करून कोरोना रूग्णांना स्वतःच्या हाताने फुडग्रेड मटेरीयल असलेल्या कप्प्याच्या प्लेटमध्ये गरम गरम जेवण पॅक करून सकाळी ११.३० वाजतां व संध्याकाळी ७.३० वाजतां दिन जात आहे .
उत्कृष्ट दर्जाचे सामुग्री वापरून पौष्ठीक जेवण तयार केले जात आहे . त्यामध्ये दोन मोठया चपात्या , सुकी भाजी , भात , वरण व अजुन एक सात्विक पदार्थ दिला जात आहे . जेवणाचा दर्जा अतिशय उत्तम व चविष्ट असल्यामुळे सिल्व्हर ज्युबीली रूग्णालयातील रूग्ण रोज ११.३० वाजतां असतात असे दिसून आले . आजारामुळे त्रासुन संध्याकाळी ७.३० वाजता जेवणाची वाट बघत गेलेल्या रूग्णांच्या चेहऱ्यावर जेवणानंतर समाधान दिसून आले .
काही रूग्ण तर मोबाईलवर जेवणाचे फोटो आपल्या घरच्यांना पाठवून आम्ही ठिक आहोत असे सांगून धीर देत आहेत . मागील काही दिवसापासुन बारामतीतील पत्रकार अमोल निलाखे यांनी १० गरजू व रूग्णांना घरून जेवण आणून देत असल्याचे काही मित्रांना दिसले . मग त्या मित्रांनी निलाखे यांचे नुसते कौतुक न करता स्वतः आर्थिक हातभार लावला . शहरातील काही व्यापारी , उद्योजक , नोकरदार असे एक एक मित्र पुढे आले व त्यांनी तब्बल सकाळी १२० रूग्ण व त्यांचे नातेवाईक व संध्याकाळी १२० जणांचा जेवणाचा खर्च उचलला व एक मोठा अन्नदानाचा दैनदिन उपक्रम सुरू झाला आहे .
कोरोनाबाधित रूग्णांच्या जवळपासही कोणी फिरकत नाही पण हे ध्येयवेडे तरूण पत्रकार अमोल निलाखे , कौशल गांधी , अजित खेडकर , शुभम सोनवणे , पत्रकार सचिन मत्रे , पत्रकार आनंद धोंगडे स्वतःच्या हाताने रूग्णांना एक त्यांचा भाऊ या माणुसकीच्या नात्याने गेल्या एक महिन्यापासून हे सर्वजण दोनवेळेचे जेवण देत आहेत .
तर काही आर्थिक मदत करणारे मित्र नाव न सांगता पैशाच्या रूपाने मदत देत आहेत . मागील काही दिवसापासुन हे अन्नदानाचे कार्य अविरत चालू आहे . शेवटी व्यक्ती किंवा समाजाची सेवा करणाऱ्यांची आर्थिक बाजू ही अत्यंत महत्वाची मानली जाते . त्यालाही एक मर्यादा आहे . दानशूर पण इच्छा असते त्यांना मदतीचा हात पुढे करण्याची त्यांना हि सुवर्णसंधीच आहे .
एक पवित्र काम करून पुण्य कमविण्याची . अशा लोकांपैकीच अॅड . योगेश लालबीगे यांनी दवाखाण्यात जेवण वाटताना बघीतले व त्यांनी लगेच १२० रूग्णांचा एकवेळचा जेवणाचा खर्च लगेच देऊन अन्नदानाला हातभार लावला . अशा पध्दतीने जर अजुन कोणी मदतीसाठी पुढे आले तर निश्चीतच अन्नदानाचा कालावधी वाढेल व जास्तीत जास्त दिवस व रूग्णांना दोनवेळचे जेवण मिळेल . आपल्याला जर या पवित्र कार्यात सहभाग घ्यावयाचा असेल तर संपर्क करा अमोल निलाखे- मो.नं. 9822198844 कौशल गांधी – मो.नं .9764999799 सचिन मत्रे – मो.नं .9561969696