स्थानिक

बारामतीतील देशपांडे विद्यालयात कोजागिरी पोर्णिमा साजरी

शिक्षकांना आपली कला सादर करण्याची संधी

बारामतीतील देशपांडे विद्यालयात कोजागिरी पोर्णिमा साजरी

शिक्षकांना आपली कला सादर करण्याची संधी

बारामती वार्तापत्र 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै.गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय बारामती येथे कोजागिरी पोर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी माजी शिक्षक व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात माजी शिक्षक व मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रम सुरू झाला. यात भजन,भक्ती गीते,भावगीते यांचे गायन,प्रहसन, हिंदी शेरशायरी,कविता सादरीकरण इत्यादी कार्यक्रम शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सादर केले.

शिक्षकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी म्हणून हा उपक्रम प्रशालेत राबवला जातो. याप्रसंगी सर्व शिक्षक व त्यांचे आप्तेष्ट उत्साहाने कार्यक्रमात सहभागी झाले होते.

यानिमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, सल्लागार समितीचे सदस्य, मएसो परिवारातील सर्व पदाधिकारी यांनी सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

अल्पोपहार व दुग्ध प्राशनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Back to top button