क्राईम रिपोर्ट

बारामतीतील धक्कादायक प्रकार! जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत १ कोटी १५ लाखांची फसवणूक

जमिनीचे शासकिय मूल्य २४ लाख आहे.

बारामतीतील धक्कादायक प्रकार! जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत १ कोटी १५ लाखांची फसवणूक

जमिनीचे शासकिय मूल्य २४ लाख आहे.

क्राईम;बारामती वार्तापत्र

जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत लाकडी (ता. इंदापूर) येथील ३ हेक्टर ४८ आर शेतजमिन नावावर करून देत १ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक दोघांनी केल्याचा प्रकार घडला. जमिनीच्या मूळ मालकाची भेट झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फसवणूकीसह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाईल क्रमांक ९६३७६७१७३६ वापरणारा व स्वतःचे नाव नरेश दुसेजा सांगणाऱया तसेच मोबाईल क्रमांक ९७६७८८२७६६ वापरणारा व स्वतःचे नाव प्रशांत जगताप (रा. पुणे) सांगणाऱया दोघा व्यक्तिंचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. यापैकी नरेश दुसेजा नावाच्या व्यक्तिने लाकडीतील जमिन त्याचीच असल्याचे भासवत तिचे खरेदीखत करून दिले आहे. याकामी प्रशांत जगताप याने त्यांना सहाय्य केले.

बारामती शहर पोलिस ठाण्यात याबाबत किशोर हनुमंत खाडे (रा. रुई, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला शेतजमिन घ्यायची होती. जमिन एजंट शहाजी नरुटे (रा. काझड, ता. इंदापूर) यांची फिर्यादीशी भेट झाली. नरुटे यांनी लाकडी येथील जमिन गट क्रमांक ९३ मधील ३ हेक्टर ४८ आर जमिन विकायची असल्याचे सांगितले.

दुसेजा (बनावट व्यक्ती) यांच्याशी त्यांचे बोलणे करून दिले. फिर्य़ादीने जमिन पाहून व्यवहा ठरवला. या व्यवहारावेळी नरेश गोपीचंद दुसेजा व प्रसांत जगताप नाव धारण करणाऱया व्यक्ति मोटारीतून (एमएच-१२, केएल-८५२१) मधून आल्या होत्या.

दुसेजा याने ही जमिन स्वतःची असल्याचे सांगितले. १ कोटी १५ लाखांना हा व्यवहार ठरला. इसारापोटी रक्कमही देण्यात आली. यावेळी दुसेजा नावाच्या व्यक्तिने माझा मूळ दस्त हरवला आहे, तो दुय्यम निबंधक कार्यालयातून काढून घेतो असे सांगत इसार पावती केली. त्यापोटी दिलेला १२ लाखांचा चेक नरेश दुसेजा नावाच्या व्यक्तिच्या नावे बारामतीच्या अॅक्सिस बॅंकेतून वटला. ३० एप्रिल रोजी फिर्य़ादीला समजले की दुसेजा नावाच्या व्यक्तिने या जमिनीचा व्यवहार यापूर्वीच संजय वामन ढोले (रा. लाकडी) यांना करून दिलेला आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ त्या व्यक्तिला संपर्क साधला.

त्यांनी ढोले यांच्यासह त्यांची भेट घेतली. तुम्हा दोघांपैकी जो कोणी अगोदर खरेदीखत करून घेईल त्याला मी जमिन देणार असल्याचे सांगितले. फिर्यादी व ढोले हे नातेवाईक असल्याने त्यांनी ढोले यांची इसारपावती रद्द करण्याचा व त्यांची रक्कम परत कऱण्याचा निर्णय घेतला.

या जमिनीचे शासकिय मूल्य २४ लाख आहे. तेवढ्या रकमेचा दस्त करण्याचे फिर्यादीचे नियोजन होते. परंतु दुसेजा व जगताप नामक व्यक्तिंनीाआम्हाला टॅक्सची अडचण येईल, शासकिय किमतीचाच दस्त करा व उरलेली रक्कम रोख द्या असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीने स्वतःच्या, भावाच्या व मामांच्या नावचे चेक त्यांना दिले.

त्यानंतर बारामतीच्या दुय्यम निबंधक कार्य़ालयात १० मे रोजी दस्त करण्यात आला. उरलेली ८८ लाख ६५ हजारांची रक्कम त्यांना रोखीत देण्यात आली. दि. २० मे रोजी बारामतीतील अॅड. भापकर यांनी फिर्यादीला फोन करत तुम्हाला बनावट व्यक्तिने दस्त करून दिल्याचे सांगितले. मूळ मालक नरेश दुसेजा यांची त्यांनी भेट घालून दिली. यावेळी मूळ मालक दुसेजा यांनी फिर्य़ादीला शेलार यांच्याकडून जमिन घेतल्याची कागदपत्रे तसेच स्वतःचे आधार, पॅनकार्ड दाखवले.

फिर्यादीने दस्तावेळी दुसेजा नावाच्या व्यक्तिने दिलेले पॅन, आधार कार्ड पाहिले असता ते बनावट असल्याचे लक्षात आले. बनावट व्यक्तिंनीच जमिन त्यांची नसतानाही बनावट कागदपत्रे तयार करत आपली फसवणूक केल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram