बारामतीतील नटराज नाट्य कला मंडळाने सादर केलेल्या ‘कर्ण’ नाटकाचे दिल्लीत दोन विशेष प्रयोग
नाटक पुणे केंद्रावर प्रथम आले होते.

बारामतीतील नटराज नाट्य कला मंडळाने सादर केलेल्या ‘कर्ण’ नाटकाचे दिल्लीत दोन विशेष प्रयोग
नाटक पुणे केंद्रावर प्रथम आले होते.
बारामती वार्तापत्र
६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावलेल्या ‘कर्ण’ या नाटकाचे दिल्ली येथे दोन विशेष नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. सदर नाटक नटराज नाट्य कला मंडळ, बारामती यांनी सादर केले असून कारवा ग्रुप यांच्या सहकार्याने हे प्रयोग होणार आहेत. हे नाटक पुणे केंद्रावर प्रथम आले होते.
महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित हे नाटक सामाजिक, मानवी व भावनिक संघर्ष प्रभावीपणे उलगडून दाखवते. नाटकाचे लेखक व दिग्दर्शक कुलविंदर बक्शीश सिंह असून त्यांच्या प्रभावी दिग्दर्शनामुळे नाटकाला विशेष उंची प्राप्त झाली आहे.
हे दोन नाट्यप्रयोग शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४;०० वाजता व सायंकाळी ६;३० वाजता दिल्ली येथील कामिनी ऑडिटोरियम येथे होणार आहेत.
दिल्ली व परिसरातील मराठी नाट्यरसिकांनी या दर्जेदार नाट्यकृतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. नाट्यप्रयोगांसाठीची तिकीटे BookMyShow वर उपलब्ध असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.






