क्राईम रिपोर्ट

बारामतीतील नामांकित वकिलाला मारहाण; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

दोन बालिका आणि एक अल्पवयीन व्यक्ती असल्याची माहिती समोर येत आहे.

बारामतीतील नामांकित वकिलाला मारहाण; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

दोन बालिका आणि एक अल्पवयीन व्यक्ती असल्याची माहिती समोर येत आहे.

बारामती वार्तापत्र

शहरातील इंदापूर चौक परिसरात एका नामांकित वकिलाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे बारामतीतील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरात वकिलासारख्या कायद्याशी संबंधित व्यक्तीलाच मारहाण होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण कसे होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इंदापूर चौक परिसरात काही जणांनी संबंधित वकिलाला अडवून त्यांच्याशी वाद घालत मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत वकिलांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण करणाऱ्यांमध्ये दोन बालिका आणि एक अल्पवयीन व्यक्ती असल्याची माहिती समोर येत आहे. पैशांच्या मागणीवरून हा वाद झाला असावा, अशीही प्राथमिक चर्चा सुरू आहे. मात्र या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, या घटनेबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही कारवाई झाल्याची माहिती मिळालेली नसल्याचे समजते. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहरात कायद्याचा धाक राहिला आहे का, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Back to top button