स्थानिक

बारामतीतील पियाजो व्हेईकल्स सोसायटीने दिला मृत सभासद साठी कल्याण निधी 

कुटुंबाला १५ लाख रुपयांचा धनादेश

बारामतीतील पियाजो व्हेईकल्स सोसायटीने दिला मृत सभासद साठी कल्याण निधी 

कुटुंबाला १५ लाख रुपयांचा धनादेश

बारामती वार्तापत्र 

पियाजो व्हेकिल्स म्हणजे केवळ नफा कमवणे उद्देश नसून सामाजिक व माणुसकीची बांधिलकी जोपासणे आहे . मृत कर्मचारी यांच्या कुटूंबियांना मदत करणे म्हणजे कामगार वर्गामध्ये परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ होऊन व मृत कर्मचारी कुटूंबियांना मानसिक, आर्थिक आधार मिळत असल्याचे कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिएगो ग्राफी यांनी व्यक्त केले.

बारामती एमआयडीसी मधील पियाजो व्हेईकल्स प्रायव्हेट लिमिटेड एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने सुरू केलेल्या सभासद मृत्यू पश्चात”सभासद कुटुंब कल्याण निधी” योजने अंतर्गत दिवंगत सभासद कै.विजय विनायक पाठक यांच्या कुटुंबाला १५ लाख रुपयांचा धनादेश गुरुवार दि.२२ जानेवारी रोजी प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी दिएगो ग्राफी बोलत होते या प्रसंगी मनुष्यबळ विकास विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट किरण कुमार चौधरी, संस्थेचे चेअरमन पार्श्वेंद्र फरसोले , व्हा.चेअरमन विजय इंगळे ,संस्थेचे सचिव रामदास रसाळ, कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाचे अधिकारी व संचालक चंद्रकांत काळे , राहुल चव्हाण, प्रशांत क्षीरसागर, अमोल सुपेकर भागवत पिसाळ, रणजीत सरगर, गणेश तावरे, सुरेश देवकाते, संभाजी परभणी सचिन ओवाळ, अमोल तुपे व तज्ञ संचालक रामचंद्र जानकर, अवधूत वेदपाठक व इतर कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

संस्थेच्या संचालक मंडळ सदस्य व सचिव यांनी कै.विजय पाठक यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना योजनेतील रक्कम तसेच शेअर्सच्या रकमेचे धनादेश सुपूर्त केले.

या उपक्रमामुळे सभासदांच्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा व त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेत भर पडावी, हा संस्थेचा उद्देश आहे असे संस्थेचे चेअरमन पार्श्वेंद्र फरसोले यांनी सांगितले.

सोसायटीच्या सभासदांच्या कुटूंबासाठी सर्वागिण आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी व त्यांना त्यांची जीवनशैली खर्च आणि उद्दिष्टे पुर्ण करण्यात मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट असून या योजने अंतर्गत संस्थेच्या सभासदत्व काळात सदस्याचे अकाली निधन झाल्यास या योजनेव्दारे त्या सदस्याच्या कुटूंबाकरिता संरक्षण रक्कम देण्यात येईल. अशी योजना सर्व कामगार, कर्मचारी सहकारी संस्थानी राबवावी असे आव्हान संस्थेचे सचिव रामदास रसाळ यांनी व्यक्त केले.

सभासदांच्या हितासाठी राबविण्यात आलेली ही योजना समाजातील सहकार्य व परस्पर विश्वास दृढ करणारी ठरत असल्याचे संचालक मंडळाने सांगितले.

Back to top button