बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे नेत्रदान संपन्न
PBMA'S H V देसाई आय रुग्णालय ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने
बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे नेत्रदान संपन्न
PBMA’S H V देसाई आय रुग्णालय ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने
बारामती वार्तापत्र
आज दि.२३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी 7.36 मी ला बारामती शहरातील बरुड गल्लीतील श्री. नारायण पानसंडे यांचे वर्द्धापकाळाने निधन झाले.त्यांचे चिरंजीव श्री.आनंत पानसंडे व सर्व कंटुबीय यांनी बारामती शहरातील सामाजिक कार्यकर्ते मा.हिंगसे अप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नारायण पानसंडे यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.
श्री. आनंत पानसंडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथील समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) श्री. बालाजी चांडोळकर
यांच्याशी संपर्क केला.
त्यांनी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, उप अधिष्ठाता डॉ. भालेराव मॅडम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल शिंदे व प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली PBMA’S H V देसाई आय रुग्णालय ,पुणे येथील समन्वयक उर्मिला प्रभुने यांना संपर्क केला व नेत्रदान करण्यासाठी H V देसाई रुग्णालयाच्या टीम ने लवकरात लवकर बारामती शहरात यावे ही विनंती केली.
सोबतच उप अधिष्ठाता डॉ. भालेराव मॅडमने स्वतः H V देसाई रुग्णालयाशी संपर्क करुन नेत्रदान यशस्वी होईल यासाठी प्रयत्न केले.समाजसेवा अधीक्षक बालाजी चांडोळकर व सुर्यकांत पाटील हे सकाळी 9.30 पासुनच पानसंडे यांच्या घरी हजर झाले.
त्यानंतर H V देसाई रुग्णालयाच्या EYE बँकेचे मॅनेजर सतिश कुरपड टीम सह सकाळी ११वाजता नेत्रदानाची प्रक्रिया करण्यासाठी उपस्थित झाले.त्यांनी नातेवाईकांना नेत्रदानाची माहिती दिली व त्यांच्या परवानगीने नेत्रदानाची प्रक्रिया पुर्ण केली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती व PBMA’S H V देसाई आय रुग्णालय ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती मध्ये नेत्रदान हे प्रथमच घडले.
श्री नारायण पानसंडे यांच्या कुटुंबाने नेत्रदान करण्याच्या निर्णय घेतल्यामुळे बारामती शहर व आजुबाजुच्या परिसरात नेत्रदानाबद्दल जनजागृती निर्माण होऊन नेत्रदान करण्यासाठी नेत्रदाते निर्माण होण्यास मदत होईल असे मत अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी व्यक्त केले.
बारामती शहर व परिसरात नेत्रदान व अवयदानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी अजून प्रयत्न करु असे उपअधिष्ठाता डॉ. प्रज्ञा भालेराव यांनी मत व्यक्त केले.H V देसाई रुग्णालय व GMC बारामती च्या संयुक्त विद्यमाने EYE Bank Collection Center चालु करण्यासाठी प्रयत्न करु असे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल शिंदे यांनी सांगितले सोबतच नेत्रदानासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे यांनी दिले.
या नेत्रदान प्रक्रियेसाठी समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय ) बालाजी चांडोळकर हे नारायण पानसंडे यांच्या कुंटुबाशी गेल्या दोन महिन्यापासून संपर्कात होते.
त्यांनी या कुटुंबाला नेत्रदान करण्यासाठी प्रोत्साहित केले व h v देसाई रुग्णालयाशी समन्वयक ठेऊन ही नेत्रदान प्रक्रिया पार पाडली .ही सर्व प्रक्रिया यशस्वी रित्या पार पडल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व पानसंडे कुटुंबाने दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचा वारसा सर्व बारामतीकर पुढे नेतील असा विश्वास व्यक्त केला.