बारामतीतील प्रसिद्ध माळांवरच्या देवी मंदिराची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात; नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी
देवीच्या मूर्तीची विशेष आकर्षक सजावट केली जाणार

बारामतीतील प्रसिद्ध माळांवरच्या देवी मंदिराची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात; नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी
देवीच्या मूर्तीची विशेष आकर्षक सजावट केली जाणार
बारामती वार्तापत्र
बारामतीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या माळांवरच्या देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या रंगरंगोटीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.
संपूर्ण मंदिर परिसर सध्या उत्सवी रंगांनी उजळून निघालेला असून, यंदाचा नवरात्रोत्सव पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि आकर्षक होणार असल्याची माहिती मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली आहे.
मंदिर परिसरात पाळणे, खेळणी आणि विविध स्टॉल्स नवरात्रोत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर परिसरात पाळणे, झुलते, खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हस्तकला वस्तूंचे दुकानं, भंडारे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
विशेष म्हणजे यंदा अनेक नव्या स्टॉल्सचा समावेश होणार असून, बारामतीकरांसह आजूबाजूच्या गावांतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
मंदिराची सजावट लक्षवेधी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यापासून ते प्रवेशद्वारापर्यंत आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट आणि पारंपरिक रांगोळ्यांनी मंदिर सजवले जात आहे.
देवीच्या मूर्तीची विशेष आकर्षक सजावट केली जाणार असून, सप्तमीपासून नवमीपर्यंत विशेष धार्मिक विधी आयोजित करण्यात येणार आहेत.