स्थानिक

बारामतीतील फटका असोसिएशनमध्ये फुट–६० वर्षांची परंपरा खंडित,सुमारे ३४ दुकानांची प्रशासनाकडून चौकशी

नागरिक संभ्रमात

बारामतीतील फटका असोसिएशनमध्ये फुट–६० वर्षांची परंपरा खंडित,सुमारे ३४ दुकानांची प्रशासनाकडून चौकशी

नागरिक संभ्रमात

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरातील फटका (फटाके) असोसिएशन ही संस्था सुमारे सत्तर वर्षांपूर्वी स्थापन झाली होती.या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी दिवाळीनिमित्त फटाक्यांची विक्री एकत्रितरीत्या आणि नियोजित पद्धतीने केली जात होती.मात्र यंदा या परंपरेला फूट पडली आहे.

काय घडलंय नेमकं?

मतभेद निर्माण झाले: असोसिएशनच्या सदस्यांमध्ये आंतरिक वाद झाले. विशेषतः अध्यक्षपद आणि दुकानांच्या गाळ्यांच्या वाटपावरून मतभेद उफाळून आले.

दोन संघटनांची निर्मिती:यामुळे फटका असोसिएशनचे दोन स्वतंत्र गट तयार झालेत.यामधून बारामती शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी फटाके विक्रीची दुकाने उघडली गेली आहेत.

नागरिक संभ्रमात: नागरिकांचीही गोंधळात टाकणारी ही स्थिती आहे. कुठे अधिक चांगले फटाके मिळणार, कोणते दुकान अधिकृत आहे,अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे.

प्रशासनाची कारवाई

तपासणी सुरू: काल बारामतीचे मंडल अधिकारी एस.बी.बडदे यांनी इंदापूर रोडवरील फटका असोसिएशनच्या कागदपत्रांची तपासणी केली.यामध्ये 34 फटाक्यांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. व तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी कागदपत्रे पाठवण्यात आली आहेत.

घबराटीचं वातावरण:या कारवाईमुळे इतर भागातील छोट्या-मोठ्या दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,विशेषतः विनापरवाना दुकाने चालवणाऱ्यांमध्ये.

परंपरेला धक्का
गेल्या ६० वर्षात फटका असोसिएशनमध्ये कधीही असे मतभेद झाले नव्हते.यंदा पारंपरिक गाळे कोणाला द्यायचे? त्यातूनच ही फूट झाली आहे.

Back to top button