बारामतीतील फेरेरो कामगार एकता पॅनेलचा विजय
बाळासाहेब डेरे अध्यक्ष व पौर्णिमा भोसले उपाध्यक्ष पदी निवड

बारामतीतील फेरेरो कामगार एकता पॅनेलचा विजय
बाळासाहेब डेरे अध्यक्ष व पौर्णिमा भोसले उपाध्यक्ष पदी निवड
बारामती वार्तापत्र
इमसोफर मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लॉईज युनियन कार्यकारिणीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शामराव डेरे यांच्या नेतृत्वाखाली फेरेरो कामगार एकता पॅनेलने ११ जागांपैकी १० जागांवर विजय मिळवला.सचिन गवळी शितल शेंडे , महेश काटे , महादेव गोसावी , ज्योती अडागळे , महेश लकडे , पोर्णिमा भोसले , संदिपकुमार बिचकुले , सचिन भगत , बाळासाहेब डेरे यांनी विजय मिळवला.
युनियनच्या कमिटीची निवड मध्ये बाळासाहेब डेरे ( अध्यक्ष ) सौ. पोर्णिमा भोसले ( उपाध्यक्ष ) महेश लकडे ( सचिव ) सचिन गवळी ( कार्याध्यक्ष ) सचिन भगत ( खजिनदार ) संदीपकुमार बिचकुले ( सहसचिव ) सौ. ज्योती अडागळे ( सहखजिनदार ) सौ. शितल शेंडे ( सदस्या )महेश काटे ( सदस्य ) महादेव गोसावी ( सदस्य )मनोज भोसले ( सल्लगार ) यांना स्थान देण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असताना कर्मचाऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध राहू असे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब डेरे यांनी केले.