बारामतीतील महाआरोग्य शिबीरात एक हजार महिलांची तपासणी
शिबीरामध्ये सर्व महिलांना आवश्यक गोळ्या व औषधे विनामूल्य वितरीत करण्यात आली.

बारामतीतील महाआरोग्य शिबीरात एक हजार महिलांची तपासणी
शिबीरामध्ये सर्व महिलांना आवश्यक गोळ्या व औषधे विनामूल्य वितरीत करण्यात आली.
बारामती वार्तापत्र
घरातील स्त्री ही त्या घराचा आधार असते, त्या मुळे तिचे आरोग्य सुदृढ राहणे गरजेचे आहे, प्रत्येक स्त्रीने नियमित तपासण्या करुन घेणे गरजेचे आहे, वेळेत निदान झाल्यास असाध्य व्याधीवरही मात करता येते, असे प्रतिपादन राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी केले.
येथील बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्कमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी (ता. 8) महिला महाआरोग्य व कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन केले गेले. या शिबीराचे उदघाटन करताना सुनेत्रा पवार बोलत होत्या.
सार्वजनिक आरोग्य विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालय, महिला शासकीय रुग्णालय, सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालय, बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क, एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, यशश्री हॉस्पिटल यांच्या वतीने या महाआरोग्य व कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन झाले. या शिबीरात शनिवार व रविवारी मिळून एक हजार महिलांची तपासणी करण्यात आली.
कर्करोगतज्ज्ञ डॉ. चकोर व्होरा यांनी या प्रसंगी व्याख्यानातून महिलांना घ्यायची काळजी, नियमित तपासणी याबाबत उपयुक्त माहिती दिली.
या शिबीरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ली, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, वैदयकीय अधीक्षक डॉ. बापू भोई व डॉ. महेश जगताप, डॉ. राकेश मेहता, डॉ. पांडुरंग गावडे, डॉ. सुयश शहा, डॉ. शीतल मेहता, डॉ. सोनिया शहा, डॉ. पूजा खताळ, डॉ. घुले, डॉ. रवींद्र हगारे, डॉ. राधेय खलाटे, डॉ. शैलेंद्र ठवरे यांच्यासह कॉटनकिंगचे संचालक कुणाल मराठे, हनुमंत पाटील, सचिन यादव, बाळराजे मुळीक, नितिन हाटे, सुनीलकुमार मुसळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात महिलांसाठी सीबीसी, थायरॉईड, शुगर, पॅपस्मिअर आणि थरमॅमोग्राफी तपासण्या करण्यात आल्या. या शिबीरामध्ये सर्व महिलांना आवश्यक गोळ्या व औषधे विनामूल्य वितरीत करण्यात आली. या शिबिरासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तालुका आरोग्य विभाग, महिला शासकीय रुग्णालय, सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालय, हेल्थ विदइन रिच फाऊंडेशन, साईधाम कॅन्सर हॉस्पिटल (राहुरी), हिंद लॅब, दि महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी विशेष सहकार्य केले.