बारामतीतील मेडिकोज् गिल्ड च्या अध्यक्षपदी डॉ प्रदीप खलाटे तर सचिवपदी डॉ निलमकुमार शिरकांडे यांची निवड.
उपाध्यक्ष म्हणून. डॉ. आशिष जळक व डॉ. चंद्रकांत पिल्ले यांची निवड

बारामतीतील मेडिकोज् गिल्ड च्या अध्यक्षपदी डॉ प्रदीप खलाटे तर सचिवपदी डॉ निलमकुमार शिरकांडे यांची निवड
उपाध्यक्ष म्हणून. डॉ. आशिष जळक व डॉ. चंद्रकांत पिल्ले यांची निवड
बारामती वार्तापत्र
मेडिकोज् गिल्ड बारामती या संस्थेचा पदग्रहण समारंभात संस्थेचे जेष्ठ सल्लागार. डॉ. श्री. अशोक तांबे सर.डॉ. आर. पी. राजे.डॉ. रमेश भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षपदी.डॉ.श्री. प्रदीप खलाटे. तर सचिवपदी डॉ. श्री. नीलमकुमार शिरकांडे यांची निवड करण्यात आली.
त्याच बरोबर उपाध्यक्ष म्हणून. डॉ. आशिष जळक व डॉ. चंद्रकांत पिल्ले यांची निवड करण्यात आली.
नूतन अध्यक्ष डॉ. खलाटे प्रदीप यांनी पदभार स्वीकारताना सांगितले की, ” संस्थेचे सभासद व वैद्यकीय व्यावसायिकांच्या हितासाठी आणि आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही नव्या योजना राबवू तसेच सर्व रोग निदान शिबिराच्या माध्यमातून आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम राबवू ” यावेळी सचिव डॉ.शिरकांडे यांनी, “संघटनेच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन आरोग्य व्यवस्थेच्या सुधारणेसाठी प्रयत्न करावेत,” असे आवाहन केले.
यावेळी संघटनेचे खजिनदार. डॉ. श्री. प्रशांत माने. डॉ. सॊ. शीतल मेहता. डॉ. संदीप शहा,
सल्लागार व कार्यकारिणी समितीचे डॉ. राजेंद्र चोपडे.डॉ.संजय पुरंदरे. डॉ.आर. एम. शहा. डॉ. दिलीप लोंढे. डॉ. नानाजी देवकाते. डॉ. बापू भोई. डॉ. सरोजणी खोमणे. डॉ. बी. एन. आटोळे. डॉ. मोहन पाटील. डॉ. अश्विन वाघमोडे.डॉ. मनोज खोमणे डॉ. सौरभ मूथा. डॉ. गणेश श्रीरामे. डॉ. सुजित अडसूळ. डॉ. प्रीतम व्होरा. डॉ. दिनेश ओसवाल. डॉ. महेश जगताप. डॉ. वैभव काटे. डॉ. राहुल संत. डॉ. नंदकुमार झांबरे आणि मोठ्या संख्येने संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.