बारामतीतील मेडिकोज गिल्ड संस्थेच्या वतीने आज सुप्रसिद्ध वात्रटिकाकार श्री. रामदास फुटाणे यांच्या “भारत कधी कधी माझा देश आहे” या कार्यक्रमाचे आयोजन
रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन.

बारामतीतील मेडिकोज गिल्ड संस्थेच्या वतीने आज सुप्रसिद्ध वात्रटिकाकार श्री. रामदास फुटाणे यांच्या “भारत कधी कधी माझा देश आहे” या कार्यक्रमाचे आयोजन
रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन.
बारामती वार्तापत्र
मेडिकोज गिल्ड बारामती या संस्थेच्या वतीने रविवार दिनांक 23 मार्च रोजी सुप्रसिद्ध वात्रटिकाकार श्री. रामदास फुटाणे यांच्या “भारत कधी कधी माझा देश आहे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त गेले वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जात असून त्याचाच भाग म्हणून या उपहास, विडंबन आणि व्यंग भाष्य कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेच्या कै. भिकोबा तांबे सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होत असून तो सर्वांसाठी खुला आहे. याचवेळी ज्येष्ठ कवी श्री शशिकांत तिरोडकर आणि सुप्रसिद्ध हास्य,विडंबन कवी अनिल दीक्षित हेदेखील आपल्या कविता सादर करणार आहेत.
बारामतीकर रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ. राजेंद्र चोपडे आणि सेक्रेटरी डॉ. चंद्रकांत पिल्ले यांनी केले आहे.