बारामतीतील रयत भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पडली पार
आगामी निवडणुका व संघटनात्मक बाबींवर झाली चर्चा.
बारामतीतील रयत भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पडली पार
आगामी निवडणुका व संघटनात्मक बाबींवर झाली चर्चा.
बारामती वार्तापत्र
आज दि.९ रोजी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रयत भवन,मार्केट यार्ड,बारामती याठिकाणी संपन्न झाली.
या बैठकीमध्ये पदवीधर निवडणूक, कोविड-19 वर उपाययोजना व जनजागृती,अतिवृष्टी आढावा,नवीन मतदार नोंदणी, आगामी निवडणुका व संघटनात्मक बाबींवर चर्चा विनिमय होऊन कोविड-19 च्या काळामध्ये घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धामध्ये प्राविण्य मिळवलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व 51 हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली.
याप्रसंगी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी प्रस्ताविकामध्ये सविस्तर आढावा दिला.याचप्रमाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी यापुढे पक्ष संघटना बळकट करून संघटनेच्या माध्यमातून निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे तसेच पक्षाच्या माध्यमातून नवीन उपक्रम हाती घेऊन साहेब,दादा व ताई यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहावे.पदवीधर निवडणुकांसाठी बारामती तालुक्यामध्ये चांगले मतदार नोंदणी झाली असुन सर्वांनी निष्ठेने व एकजुटीने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी इम्तियाज शिकलकर,सचिन घोटकुले,कु.पूजाताई बुट्टे पाटील,निताताई बारवकर,बाळासाहेब तावरे,प्रमोद काकडे,पुरुषोत्तम जगताप,संदीप जगताप,राजवर्धन शिंदे,अनिल खलाटे, शिवाजीराव टेंगले,प्रदीप धापटे,वनिताताई बनकर,रोहिणीताई तावरे,अबोली भोसले, पोपट पानसरे,विक्रम आटोळे,बाबुराव चव्हाण,गुलाबराव देवकाते, मुरलीधर ठोंबरे,नितीन शेंडे,तानाजी कोकरे,पृथ्वीराज जगताप,भरत खैरे,प्रकाश तावरे,गौतम काकडे,रवींद्र माने,डॉ.अनिल सोरटे,तुषार कोकरे,विक्रम भोसले,अमरदादा जगताप,अविनाश भिसे,जितेंद्र काटे,अतुल खैरे,कु.भाग्यश्री धायगुडे,सुनिल बनसोडे आदी मान्यवरांसह संस्था पदाधिकारी,सर्व सेल व प्रमुख आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन कार्याध्यक्ष धनवान वदक यांनी केले. तर आभार युवक अध्यक्ष राहुल वाबळे यांनी केले.