स्थानिक
बारामतीतील रस्त्यावरील जनावरे मालकांनी ताब्यात घेण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन
मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील

बारामतीतील रस्त्यावरील जनावरे मालकांनी ताब्यात घेण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन
मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात गाई, बैल व गाढव या भटक्या जनावरांमुळे सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीसह पदपथ व रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका तसेच वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. यामुळे जनावरे मोकळी न सोडता मालकांनी ताब्यात घ्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरामध्ये पदपथ, रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली या भटक्या जनावरांमुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत आहे.
ही जनावरे शहरातील व बाह्य परिसरातील नागरिकांच्या मालकीची असल्याचे निदर्शनास आले आहे. येत्या काळात नगरपरिषदेच्यावतीने ही जनावरे कोंडवाड्यात स्थलांतरित करुन संबंधित जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.