राजकीय

बारामतीतील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांचा राजीनामा

शहराध्यक्ष म्हणून जय पाटील यांनी केलेल्या कामाचा उल्लेख त्यांनी अनेक अनेक वेळा केला.

बारामतीतील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष
जय पाटील यांचा राजीनामा

शहराध्यक्ष म्हणून जय पाटील यांनी केलेल्या कामाचा उल्लेख त्यांनी अनेक अनेक वेळा केला.

बारामती वार्तापत्र 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती शहराध्यक्ष जय पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांच्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. कार्यकाळ संपल्याने व नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आपण शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याचे जय पाटील यांनी स्पष्ट केले.

शहराध्यक्ष पदाची धुरा हातात येताच जय पाटील यांनी
शहरात कामाचा झंजावात सुरू ठेवला होता. पक्ष संघटन वाढीसाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी कामाच्या माध्यमातून लक्ष वेधले होते. युवकांचे संघटन मजबूत करत पक्षाला बळ देण्याचे काम त्यांनी त्यावेळी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिरांचे आयोजन करून हजारो बाटल्या रक्त संकलित करण्याचे काम केले. यामुळे शहरातील युवक आरोग्य सेवेसी जोडला गेला.

रक्तदान शिबिराबरोबरच शहरात आरोग्य शिबिरे घेतली त्याला बारामतीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. पाटील शहराध्यक्ष झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करत त्यांनी राष्ट्रवादी शहर कार्यालय नव्याने बांधले. त्यामुळे शहरात पक्ष संघटनेला ऊर्जेत अवस्था प्राप्त झाली. लोकसभा विधानसभेवेळी एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम संपूर्ण शहरात राबविण्यात आला.

त्यामध्ये प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वय वाढण्यास मदत झाली. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील राष्ट्रवादी पुन्हा हा उपक्रम राबविण्यात आला.

त्यामध्ये प्रभाग दौरे झाले. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात बारामती शहरात झालेली विकास कामे व भविष्यातील व्हिजन नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत झाली. लोकसभा निवडणुकीनंतर बारामती शहर व तालुक्यातील कार्यकारणी बदलण्याचा घाट घातला गेला त्यानंतर देखील जय पाटील यांच्यावर अजित पवार यांनी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी कायम ठेवली.

शहराध्यक्ष म्हणून जय पाटील यांनी केलेल्या कामाचा उल्लेख त्यांनी अनेक अनेक वेळा केला. असे असले तरी देखील कार्यकाळ संपल्याने व नगरसेवक पदी निवड झाल्याने जय पाटील यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले.संघटनेमध्ये काम करत असताना ज्या विद्यार्थी युवकांनी महिला पदाधिकाऱ्यांनी जी साथ दिली त्याबद्दल जय पाटील यांनी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Back to top button