स्थानिक

बारामतीतील रुई मध्ये आरोग्य तपासणी संपन्न

आरोग्याबाबत जनजागृती

बारामतीतील रुई मध्ये आरोग्य तपासणी संपन्न

आरोग्याबाबत जनजागृती

बारामती वार्तापत्र 

महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय रुई, बारामती आणि सर्व्हिस  इंजिनिअर्स फोरम बारामती यांचे संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ अभियंते आणि त्यांचे कुटुंबीयकरिता आरोग्य तपासणी शिबिर शनिवार १५ नोव्हेंबर रोजी रुई ग्रामीण रुग्णालय येथे संपन्न झाले.

या प्रसंगी रुई ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. यास्मिन पटेल, बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे,फोरमचे अध्यक्ष इंजि. अजित जमदाडे इंजि.हेमचंद्र शिंदे ,डॉ. हेमंत गाढवे डॉ. ज्योती घोरपडे  डॉ.संजय घुले डॉ. यश जोशी डॉ.अविराज घुमरे व इतर मान्यवर उपस्तीत होते.

रुई ग्रामीण हॉस्पिटल मधील सर्व तपासण्या अत्यंत दर्जेदार असून नागरिकांनी या मोफत तपासणीचा फायदा घ्यावा त्यासाठी इंजिनीअर्स फोरम सारख्या समाजातील इतर संस्थांनी आरोग्याबाबत जनजागृती करून शिबिरांचे आयोजन करावे असे आवाहन रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.यास्मिन पटेल यांनी केले.

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आजार आत्ता वय पाहत नाही म्हणून  फक्त ज्येष्ठांनी नाही, तर तरुणांपासून सर्वांनी दरवर्षी नियमितपणे आरोग्य तपासणी केलीच पाहिजे. इंजि हेमचंद्र शिंदे यांनी वाढदिवस निमित्त आरोग्य तपासणी चे आयोजन करणे उल्लेखनीय असल्याचे डॉ मनोज खोमणे यांनी सांगितले.

सिराज खोमणे, मुस्कान पटेल आणि तानिया पटेल या विद्यार्थ्यांनी नीट २०२५ परीक्षेमध्ये उज्वल यश प्राप्त करून वैद्यकीय शाखेत मेरिट मधून प्रवेश प्राप्त केल्याबद्दल सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती तर्फे सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.

स्वागत इंजि हेमचंद्र शिंदे व आभार इंजि अजित जमदाडे यांनी मानले.

फोटो ओळ:
रुई ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य तपासणी प्रसंगी मान्यवर,डॉक्टर व इतर

Back to top button